केदार शिंदे हे सध्या मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक आहेत. २०२३ या वर्षाने त्यांना चांगलंच प्रसिद्धीच्या झोतात आणलं. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘अग्गंबाई अरेच्चा २’ या चित्रपटाच्या अपयशानंतर सात वर्ष केदार शिंदे दिसले नाहीत. त्यामुळे आता केदार शिंदे परत येत नाही, अशी समज अनेकांची झाली होती. पण २०२३मध्ये केदार शिंदे यांनी असं काही मनोरंजन सृष्टीत पुनरागमन केलं, ज्याची दखल राष्ट्रीय पातळीपर्यंत घेण्यात आली.

२०२३ साली केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. पण यातील एक चित्रपटाने म्हणजेच ‘बाईपण भारी देवा’ने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले. ३० जून २०२३ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला मराठी रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. एकदा नाही तर अनेक वेळा प्रेक्षक ‘बाईपण भारी देवा’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन यांची सांगड उत्कृष्टरित्या झाल्याने ‘बाईपण भारी देवा’ ब्लॉकबस्टर ठरला. केदार शिंदेंच्या याच कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. यंदाच्या ‘फोर्ब्स इंडिया मॅगझिन’मध्ये केदार शिंदे यांच्याविषयी लिहिण्यात आलं आहे. अ‍ॅटली, करण जोहर, सिद्धार्थ आनंद, विधू विनोद चोप्रासह केदार शिंदे झळकले आहेत. हाच क्षण पाहून केदार यांच्या पत्नी बेला शिंदे भारावून गेल्या.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
Eknath Shinde is now Deputy CM and second ranked leader in Devendra Fadnavis government
एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’

हेही वाचा – “आयुष्यातला एक….”, ‘बिग बॉस मराठी ४’च्या आठवणीत पुन्हा रमला विजेता अक्षय केळकर, निमित्त होतं खास

बेला शिंदे यांनी सोशल मीडियावर फोर्ब्स इंडिया मॅगझिन व त्यामधील केदार यांच्याविषयी लिहिलेल्या लेखाचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिल आहे, “काल काही ठाऊक नसताना ही माझ्या आयुष्यात घटना घडली… Forbes India magazine (फोर्ब्स इंडिया मॅगझीन)मध्ये केदार विषयी लिहून आलं. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. कुठल्यातरी अनोळखी व्यक्तींनी ही घेतलेली दखल. थोरामोठ्यांच्या मांदियाळीत त्याला पाहिलं. डोळे पाणावले. २७ वर्षे त्याची धडपड पाहत आहे. हे सगळं घडलं ते तुम्हा रसिकांच्या प्रेमाने. स्वामी कृपेने त्याची घोडदौड अशीच सुरू राहो. त्यावर तुम्हा सगळ्यांचं प्रेम कायम राहो… अजून बराच पल्ला गाठायचा आहे. श्री स्वामी समर्थ.”

हेही वाचा – काय म्हणता! विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाच्या घरी लवकरच वाजणार सनई-चौघडे , ‘या’ महिन्यात उरकणार साखरपुडा?

बेला शिंदे यांच्या पोस्टवर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सुंदर, पडत्या काळात तुम्ही मराठी चित्रपटाना चांगले दिवस दाखवले”, “अरे वाह खूप छान”, “कसलं भारी…”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Story img Loader