‘लंडन मिसळ’ हा मराठमोळा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीन वाढली आहे. या चित्रपटातून भरत जाधव एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- कुशल बद्रिकेने दिले ‘पांडू २’ चित्रपटाचे संकेत, विजू माने म्हणाले “आता तू म्हणतोस तर…”

‘लंडन मिसळ’मध्ये अभिनेता भरत जाधव अभिनेत्री ऋतुजा बागवे, गौरव मोरे, रसिका क्षोत्री, माधुरी पवार, अभिनेता गौरव मोरे, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे, सुनील गोडबोले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात लंडनमध्ये मिसळचं हॉटेल उभं करण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या दोन बहिणींची कथा बघायला मिळणार आहे.

भरत जाधव यांनी पहिल्यांदाच या चित्रपटासाठी रॅप गायले आहे. तसेच ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून प्रेरित असल्याचेही म्हणण्यात येत आहे. या चित्रपटाची कथा जालिंदर कुंभार यांनी लिहिली आहे, तर पटकथा व संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै व आरोन बसनेट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर वैशाली पाटील या चित्रपटाच्या सहयोगी निर्मात्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat jadhav gurav more rutuja bagwe new movie london misal teaser release dpj