मराठी मनोरंजनसृष्टीतला विनोदवीर म्हणून भरत जाधव यांना ओळखले जाते. अनेक विनोदी भूमिकांच्या माध्यमातून भरत यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवले. भरत जाधव यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही महिन्यांपूर्वीच भरत आपल्या कुटुंबासह कोल्हापूरात स्थाईक झाले. दरम्यान एका मुलाखतीत भरत यांनी कोल्हापूरात घर घेण्यामागचं कारण सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- भरत जाधव यांच्याकडे किती संपत्ती आहे? खुद्द त्यांनी केला खुलासा; म्हणाले, “नवीन जमीन आवडली की….”;

लवकरच भरत जाधव यांचं अस्तितव हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने भरत जाधव यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भरत त्याच्या कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला राहत आहे. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. आता भरत यांनी कोल्हापूरात घर घेण्याचा आणि तिथे स्थाईक होण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.

भरत म्हणाले, “माझ्या आई-वडिलांची इच्छा होती आपलं गाव कोल्हापूर आहे तर गावात एक घर असावं. कोल्हापूरात आम्ही नेहमी पाहुण्यांकडे उतरायचो. त्यामुळे माझ्या आई-वडिलांनी मला कोल्हापूरात फ्लॅट किंवा घर बघ असं सांगितलं. मी कोल्हापूरात चित्रपटांसारखा बंगला बांधला. मी माझ्या भावंडांना तो दाखवला पण आई-बाबांना दाखवला नाही. मी बंगल्याचे व्यवहार केल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला विमानाने घेऊन कोल्हापूरला गेलो आणि वडिलांना बंगला दाखवला तेव्हा वडिलांनी बंगला बघितला. आई-वडिल तिथे राहिले. ते तिथे राहतात म्हणून मी कोल्हापूरात राहतो. त्यांची इच्छा आहे तिथे पाहिजे कोणीतरी म्हणून मी आत्ता कोल्हापूरात राहतोय.”

हेही वाचा- …म्हणून भरत जाधव यांना आहे गाड्यांची हौस; वडिलांनी व्हॅनिटी व्हॅन पाहिली होती तेव्हा…

भरत जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर १९९९ मध्ये आलेल्या ‘लक्ष्मी’ चित्रपटातून भरत जाधवने मनोरंजन सृष्टीत पदापर्ण केलं. पछाडलेला, खबरदारसारख्या चित्रपटांमधून भरत जाधवला प्रसिद्धी मिळाली. त्यांची ‘सही रे सही’, ‘ऑल द बेस्ट’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ नाटक प्रचंड गाजली. आता ८ डिसेंबरला त्यांचा ‘लंडन मिसळ’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव हटक्या भूमिकेत दिसणार आहेत.