मराठी अभिनेता भरत जाधवने अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने मुंबई सोडली आणि तो कुटुंबाबरोबर कोल्हापुरात राहत आहे. मूळचा कोल्हापूरचा असलेल्या भरतने काही महिन्यांपूर्वी कुटुंबासह मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. आयुष्याच्या या टप्प्यावर त्याने असा निर्णय का घेतला? आणि आपल्या राहण्यासाठी त्याने कोल्हापूर शहर का निवडले? याबद्दल त्याने अलीकडेच खुलासा केला आहे.

अमिताभ बच्चन यांचा फोन आल्यावर अशी होती नितीन गडकरींची प्रतिक्रिया; किस्सा सांगत म्हणाले, “बिग बींनी मला…”

Solapur, Abuse of girl Solapur, Solapur crime news,
सोलापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Dhule Crime News Nijampur
Dhule Crime News: प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला! जिल्ह्यात निर्माण झाला तणाव, पोलीस म्हणाले…
Student died Borivali , dumper, mumbai,
बोरिवलीमध्ये डंपरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
Mumbai crime news, Youth Murder Ghatkopar,
मुंबई : घाटकोपरमध्ये तरुणाची हत्या
Rape in goa
Rape in Goa : गोव्यात ४ वर्षीय युरोपिअन चिमुरडीवर बलात्कार, पोलिसांकडून बिहारच्या बांधकाम कामगाराला अटक!
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram to join Sharad Pawar faction
गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम कुटुंबातील बंडावर शिक्कामोर्तब; भाग्यश्री आत्राम १२ सप्टेंबरला…
3 people suffered with severe eye damage due to lasers light in kolhapur
कोल्हापुरात लेझरमुळे तिघांच्या डोळ्यांना गंभीर इजा; नेत्रविकार तज्ज्ञांकडून बंदी घालण्याची माग

मुंबई सोडून कोल्हापुरला जाण्याबाबत भरत म्हणाला, “मुंबई शहर बिझनेस हब झालंय, असं मला वाटतंय. मी असा विचार करत आहे कारण मला आता सगळ्या गोष्टींपासून सुटका हवी आहे. आता माझ्याकडे कोल्हापुरात एक घर आहे आणि माझे आई-वडीलही माझ्यासोबत राहतात. काम असेल तेव्हा मी इथे मुंबईला येतो. मी माझा मुंबईचा फ्लॅट विकला नाही. शूटिंग किंवा काम असेल तेव्हा मी इथे येतो आणि परत कोल्हापूरला जातो.”

“बाळासाहेबांचं ते स्वप्न अपूर्णच”, नितीन गडकरींचा खुलासा; म्हणाले, “त्यांच्या निधनाआधी मी रुग्णालयात भेटल्यावर…”

या निर्णयाबद्दल पुढे भरत म्हणाला, “आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडं थांबणं, वेळ घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने कोल्हापुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मला तिथे छान वाटतं, तिथे ताजी हवा आहे. मला मुंबई खूप आवडते. पण तिथून काम करणं गरजेचं राहिलेलं नाही. आता मी कोल्हापूरहून मुंबईला काम करण्यासाठी येतो, माझं काम झालं की कोल्हापूरला परत जातो.