मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेनं नाटक, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयाच्या कौशल्याबरोबरच ती उत्तम नृत्यही करू शकते. भार्गवीच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाचे प्रयोग सध्या मुंबई, पुणे, नाशिक येथे सुरू आहेत. नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनेक गमतीजमती घडत असतात. अशीच एक घडलेली गंमत भार्गवीनं नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे.

नुकताच झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा पार पडला. ७ मार्चला झी मराठी वाहिनीवर या सोहळ्याचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याच्या वेळी दिलेल्या मुलाखतीत भार्गवीनं एक किस्सा सांगितला. भार्गवी म्हणाली, “नाटक म्हटल्यानंतर किस्से, आयत्या वेळी काहीतरी गडबड होणं हे स्वाभाविकच आहे. पण, ती गडबड प्रेक्षकांपर्यंत पोहोचू न देणं यातच कलाकाराच्या अभिनयाचा कस लागतो, असं मला वाटत. ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटक सध्या चालू आहे. हे कॉमेडी नाटक आहे. त्यामुळे आम्हा सगळ्यांना सतत भयंकर अलर्ट राहावं लागतं. त्यात पंच लाइन्स, टायमिंग हे सगळं विनोदी नाटकाचा एक भाग असतो. त्याच्यामुळे अनेक गोष्टींची व्यवधानं सांभाळत आम्हाला हे नाटक करावं लागतं.”

mohan bhagwat
Mohan Bhagwat : “घरवापसीमुळे आदिवासी देशद्रोही झाले नाहीत!” प्रणब मुखर्जींच्या विधानाचा मोहन भागवतांनी दिला दाखला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
trinidha rao nakkina apologize anshu ambani
आधी अभिनेत्रीच्या शरीराबद्दल केलं आक्षेपार्ह विधान, नंतर दिग्दर्शकाने मागितली माफी; अंशू अंबानी प्रतिक्रिया देत म्हणाली…
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
thane fake baba marathi news
काळ्या जादूचा नाश करण्यासाठी बाबा आणणार होता मृतदेह, मृतदेह आणण्यासाठी बाबाने घेतले ८ लाख ८७ हजार रुपये
Premachi Goshta actress Swarda Thigale react on troller
“रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”

हेही वाचा… “अस्तिकाचा वध नेत्राच्या हातून…”; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या दिग्दर्शकांनी केला खुलासा

अभिनेत्री पुढे म्हणाली, “प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की, आपण त्या क्षणाला ‘ब्लॅंक’ होऊन जातो. आपल्याला त्यावेळी पुढे काय घडणार आहे, आपण कुठे आहोत, काय आहोत हे काहीच आठवत नाही. आपल्या डोळ्यांपुढे पूर्णपणे अंधारी येते. त्याला आम्ही कॉमेडी भाषेत ‘ब्लॅंक ऑफ इंडिया’ म्हणतो. परवाच्या प्रयोगाला असंच झालं होतं. मी स्टेजवर पूर्णपणे ‘ब्लॅंक ऑफ इंडिया’ झाले आणि तसं झाल्यानंतर कुठल्याही कलाकाराच्या डोळ्यांत ते दिसतं. समोरचा कलाकार जर तुमचा मित्र असेल, तर त्याला हे लगेच कळतं. वैभवलासुद्धा हे कळलं की, मला काहीच आठवत नाही. वैभवनं, माझ्याकडे बघून काय? असं विचारलं. तेव्हा मी खूप मनापासून ते वाक्य शोधत होते.”

“जसं मी म्हटलं की, कॉमेडी नाटक असल्यामुळे एकावर एक अशी वाक्यं असतात. माझी वाक्यं तो घेऊ शकत नव्हता आणि ती घेतल्याशिवाय नाटकात पुढे जाताच येत नव्हतं. नाटकात निमिष कुलकर्णी आहे आणि त्याला कळल नव्हतं की, मी विसरलीय. कारण- माझ्याकडे त्याची पाठ होती. तो वाट बघतोय- वाक्य का येत नाही आहे, मी विचार करतेय- वाक्य काय आहे आणि एका पॉईंटला वैभवनं माझ्याकडे असे डोळे मोठे करून वाक्य, असं म्हटलं आणि मग त्या क्षणाला मनात वीज चमकली आणि मला ते वाक्य आठवलं. फायनली मी ते वाक्य बोलली आणि म्हणून नाटक पुढे गेलं. नाही तर बराच वेळ नाटक तिथेच अडकून राहिलं असतं. पण, त्या दिवशी मी खरंच मनापासून रंगदेवतेची माफी मागितली की, माझ्या हातून काय चुकलं असेल, तर मला माफ कर. पण, पुन्हा कधी माझ्याच काय कुठल्याच कलाकाराच्या आयुष्यात असं होऊ नये. तेव्हा आपला सहकलाकार आपल्याला जे सांभाळून घेतो आणि आपण काहीच घडलं नाही, असं दाखवतो. या दोन गोष्टी अभिनयाचा कस दाखविण्यासाठी एका कलाकारासाठी खूप आहेत,” असंही भार्गवीनं नमूद केलं.

हेही वाचा… २० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी

दरम्यान, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटकाचे प्रयोग नाशिक, पुणे, चिंचवड, बोरिवली, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, वाशी, पार्ले येथे होणार आहेत. या नाटकात वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, सुकन्या काळण, निमिष कुलकर्णी व विकास चव्हाण असे तगडे कलाकार आहेत. मध्यंतरी हे कलाकार ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नाटकाच्या सेटवर ‘बटरफ्लाय बटरफ्लाय’ ट्रेंडवर थिरकताना दिसले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Story img Loader