‘टाइमपास’, ‘घरत गणपती’, ‘रे राया’, ‘ती आणि इतर’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘आम्ही दोघी’, अशा चित्रपटांतून अभिनेता भूषण प्रधान(Bhushan Pradhan)ने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकताच तो ‘जुनं फर्निचर’, ‘घरत गणपती’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटांतील त्याच्या भूमिकांचे व त्याच्या अभिनयाचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. आता एका मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकारांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे, असे म्हटले आहे.

काय म्हणाला भूषण प्रधान?

भूषण प्रधानने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्याने म्हटले, “हिंदी इंडस्ट्रीमध्ये मराठी कलाकारांना खूप जास्त आदर दिला जातो. जेव्हा तुम्ही हिंदी इंडस्ट्रीमध्ये जाता, मराठी इंडस्ट्रीमधील व्यक्ती म्हटलं की, एक काळ असा होता की, तेव्हा थोडंसं कमी लेखलं जायचं; ते आता नाहीये. एक वेगळा आदर असतो. पण, तेच आपण अजूनही तो आदर देणं शिकतोय, शिकलो नाहीये. कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही. आपण अभिमानाने सांगतो की, मराठी माणसं पाय खेचतात. हे कधी बदलणार? कळतंय; पण वळत का नाहीये? साध्यात साधं एकंदरीत कळलं की, कोणी नवीन चित्रपट करतंय. ‘जुनं फर्निचर’, ‘घरत गणपती’बाबतीत तेच झालं. महेशसरांना विचारलं की, या चित्रपटात मुलाची भूमिका कोण करतंय. तर भूषण करतोय, असं सरांनी सांगितल्यावर त्यांना हे म्हटलं हे जायचं की, त्याला कशाला घेतोय? हे इंडस्ट्रीमधल्या लोकांनी, ज्यांनी कामही केलं नाहीये, त्यांनी हे सांगितलंय.”

Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
jaideep ahlawat on nepotizam and alia bhatt
‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावतचे नेपोटिझमवर भाष्य; आलिया भट्टबद्दल म्हणाला, “त्यात तिची चूक काय?”
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”

पुढे बोलताना त्याने म्हटले, “तुम्ही त्या कलाकाराला सांगितलं पाहिजे की, तू या भूमिकेसाठी अशी अशी तयारी कर. अशा प्रकारे आदर ठेवला जाऊ शकतो. एकमेकांचा आदर करून एकमेकांना मोठं करणं गरजेचं आहे. आपण आपल्या आपल्यामध्ये भांडलं नाही पाहिजे, याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आपण दुसऱ्या इंडस्ट्रीबरोबर स्पर्धा करीत आहोत. आपल्या कुटुंबातील दोन भाऊ भांडत राहिले, तर त्याचा काही उपयोग नाही. दुसऱ्या कुटुंबापेक्षा मोठं व्हायचं आहे, तर एकमेकांना मोठं करणं गरजेचं आहे.”

महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना भूषण प्रधानने कृतज्ञता व्यक्त केली. महेशसरांनी मुलाच्या भूमिकेसाठी मला निवडणं ही मोठी गोष्ट आहे. त्यांच्याकडे कितीतरी पर्याय असतील. त्यामुळे ‘जुनं फर्निचर’ व ‘घरत गणपती’ या दोन्ही चित्रपटांत मी दोन्ही पात्रं जगलो. दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शकांचं ध्येय खूप स्पष्ट होतं. या चित्रपटांत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा होता. स्वत:मधला कोणताही कमकुवतपणा पाहिला, स्वीकारला आणि त्यामध्ये सुधारणा केल्या, तर आपण स्वत:मध्ये बदल करू शकतो, असे म्हणत भूषणने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: Video: पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया

आता भूषण प्रधान कोणत्या नवीन चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Story img Loader