‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचं विजेतपद शिव ठाकरेने पटकावलं. त्यानंतर त्याचं नशिबच बदललं. शिव या शोनंतर अधिक प्रकाश झोतात आला. पण तो इथवरच थांबला नाही. हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचं त्याने स्वप्न पाहिलं. शिवने त्याचं हे स्वप्न पूर्ण करत ‘बिग बॉस १६’च्या फिनालेपर्यंत मजल मारली. ‘बिग बॉस १६’चा तो उपविजेता ठरला. त्याच्या चाहत्यांसाठी मात्र तोच विजेता आहे.
आता शिवला मोठ्या पडद्यावर काम करायचं आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी तो सध्या मेहनतही घेत आहे. याचबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने भाष्य केलं. त्याने रितेश देशमुखबाबत एक व्यक्तव्यं केलं आहे.
शिव म्हणाला, “मराठी चित्रपटांसाठी सध्या माझं काम सुरू आहे. पण रितेश देशमुख यांनी जर मला त्यांच्या चित्रपटद्वारे लाँच केलं तर माझ्यासाठी ही मोठी गोष्ट असणार आहे. काही महिन्यांनंतर जर त्यांनी मला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली तर ही माझ्यासाठी आनंदाची बाब असेल”.
आणखी वाचा – रिक्षा, मित्राच्या कारने प्रवास करायचा शिव ठाकरे, आता खरेदी केली स्वतःची आलिशान कार, म्हणाला, “माझं आयुष्य…”
रितेशच्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी शिव प्रयत्न करत आहे. त्याचं हे स्वप्न पूर्ण होणार का? हे येत्या काळात समजेलच. पण त्याचपूर्वी शिव विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. त्याने स्वतःचं युट्यूब चॅनल लाँच केलं आहे. शिवाय वेगवेगळ्या कार्यक्रमांनाही तो हजेरी लावताना दिसत आहे.