बरेच असे मराठी कलाकार मंडळी आहेत, जे राजकारणात सक्रिय आहेत. प्रिया बेर्डे, दिपाली सय्यद, अभिजित पानसे असे बरेच कलाकार मंडळी राजकारणात आहेत. गेल्या महिन्यातच अभिनेता हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, माधव देवचके या कलाकारांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. आता त्यानंतर बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. याबाबत त्यानं स्वतः सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं शीर्षकगीत प्रदर्शित; गायकांचं ‘सारेगमप’शी आहे खास कनेक्शन

हा बिग बॉस मराठी फेम अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता अभिजीत केळकर आहे. अभिजीत नेहमी सोशल मीडियाद्वारे प्रत्येक घडामोडींवर आपलं परखड मत व्यक्त करत असतो. काही दिवसांपूर्वी त्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कौतुकास्पद पोस्ट शेअर केली होती; जी चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता त्यांनं निर्भीडपणे बोलण्यासाठी राजकारणात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Video: “समोरचा मेला तरी कोणी…”, शरद पोंक्षेंचं वक्तव्य चर्चेत; चाळ संस्कृतीविषयी केलं भाष्य

अभिनेता अभिजीत केळकरनं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अभिजीतनं बावनकुळे आणि प्रिया बेर्डे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश… जसं ते म्हणतात, तुमचं व्यवस्थेत असणं महत्त्वाचं आहे ती बदलण्यासाठी…किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची? त्या प्रवाहात सामिल होऊन, समजून घेऊन, काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया…”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीची सर्वात आवडती गोष्ट माहितेय? जाणून घ्या

अभिजीतची ही पोस्ट पाहून चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, “मनापासून अभिनंदन.” तर दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं आहे की, “जबरदस्त सरप्राइज होतं. पूर्णपणे अनपेक्षित होतं. नवीन प्रवासासाठी तुला शुभेच्छा.” तसेच तिसऱ्या चाहत्यानं लिहिलं आहे की, “तुझ्यासारखा समंजस व्यक्ती एका समजूतदार पक्षात सहभागी झाला. याचा खूप आनंद झाला आहे.”

हेही वाचा – अपूर्वा नेमळेकरला अजूनही येत आहे शेवंताची आठवण; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “या भूमिकेशी…”

दरम्यान, अभिजीतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच तो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेतमध्ये झळकला होता. बालगंधर्वांच्या भूमिकेत तो पाहायला मिळाला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame actress abhijeet kelkar join bharatiya janata party pps