Worli Hit and Run Case Marathi Actor Post : मुंबईतल्या वरळी परिसरात दोन दिवसांपूर्वी भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू गाडीने एका महिलेला चिरडल्याची घटना घडली. वरळीतील या हिट अँड रन प्रकरणामुळे सध्या संपूर्ण मुंबई हादरुन गेली आहे. या घटनेत ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती प्रदीप नाखवा ( वयवर्ष ५० ) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांच्या तपासानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीरचा यामध्ये सहभाग असल्याचं समोर आलं.

आरोपी मिहीर शाह अपघातानंतर फरार झाला होता. पण, अखेर त्याला मुंबई पोलिसांनी शहापूर येथून अटक करण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. याप्रकरणी सध्या सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेत मृत पावलेल्या कावेरी नाखवा या मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या सख्ख्या पुतणी लागत होत्या. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती. यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याने या घटनेसंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे.

kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Navri Mile Hitlarla
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”
Neelam gorhe statement about ram shinde in Legislative Council hall is viral
नीलम गोऱ्हे राम शिंदेंना म्हणाल्या, “आता तुम्हाला मागच्या दाराने….”
reshma shinde reveals husband pavan
“मी अभिनेत्री आहे हे पवनला माहिती नव्हतं…”, साऊथ इंडियन सासरी मराठी मालिका पाहतात का? रेश्मा शिंदे म्हणाली…
Image Of Ram Shinde And Ajit Pawar.
Ajit Pawar : “आपण हरलात ते योग्य झालं”, राम शिंदेंचे अभिनंदन करताना अजित पवारांची टोलेबाजी
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray shivsena
Deepak Kesarkar : “…तर शिवसेनेचे दोन भाग झालेच नसते”, ठाकरे-फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

हेही वाचा : Worli Hit and Run Case : प्रदीप नाखवांचा हा आक्रोश पाहून तुमचंही मन हेलावून जाईल! म्हणाले, “मी बोनेटवर हात मारला, पण…”

उत्कर्ष शिंदेची पोस्ट

“फार फार तर उद्या ‘सिम्बा’… ‘सिंघम’…’सूर्यवंशी’सारख्या चित्रपटांची सुरुवात अशाप्रकारच्या अपघाताने होईल आणि फिल्मी न्याय फक्त त्या चित्रपटात मिळेल. सत्यात न्याय देणारे…न्याय मिळू देणार नाहीत. मराठीचा टेंभा मिरवणारे मराठी माणसाला न्याय मिळवून देतील का? आता होईल ती दुकानदारांची ‘सेटलमेंट” अशी पोस्ट शेअर करत उत्कर्षने घडलेल्या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.

utkarsh
उत्कर्ष शिंदेची पोस्ट

हेही वाचा : Worli Hit And Run Case : “आरोपीला फाशी द्या”, ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या पुतणीचा मृत्यू; म्हणाले, “सगळे पुरावे…”

नेमकं काय घडलं?

रविवारी ( ७ जुलै ) पहाटेच्या सुमारास वरळीतील अट्रिया मॉलजवळ ही घटना घडली. यावेळी नाखवा दाम्पत्य दुचाकीवरुन प्रवास करत होतं. ससून डॉक परिसरातून मासे विकत घेऊन ते दोघंही घरी जात होते. यादरम्यान भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यू गाडीने नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये प्रदीप नाखवा बचावले परंतु, त्यांच्या पत्नी कावेरी यांचा या घटनेत मृत्यू झाला.

Story img Loader