‘सैराट’फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सध्या चर्चेत आहे. काल ३ जून रोजी रिंकूने तिचा २४ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त एका खास व्यक्तीने तिला सरप्राईज दिलं. याबाबत रिंकूने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचे आभार मानले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिंकू सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनयाव्यतिरिक्त ती वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच तिने तिचा वाढदिवस साजरा केला, यासाठी आता तिने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा… VIDEO: रागावलेल्या ऐश्वर्या नारकर यांचा रुसवा घालवताहेत अविनाश नारकर, व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “छोट्या भांडणानंतर…”

रिंकूने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओत रिंकूने तिच्या खास दिवशी घालवलेल्या क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये रिंकू सुरुवातीला केक खाताना दिसतेय. रिंकूच्या घरी वाढदिवसानिमित्त खास सजावटदेखील केलेली दिसतेय. हार्ट शेपचे फुगे, बुके, हातात गुलाब असे वेगवेगळे फोटो रिंकूने शेअर केलेत. रिंकू मरीन ड्राईव्हवरदेखील केक कापत तिचा वाढदिवस साजरा करताना दिसतेय.

“माझ्या बर्थडे केकचा आणि क्षणांचा हा एक गोड तुकडा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी सगळ्यांना मनापासून धन्यवाद”, असं कॅप्शन रिंकूने या पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा… “मी खूप वाईट बाबा आहे”, असं का म्हणाले होते करिश्मा आणि करीना कपूरचे वडील?

रिंकूने कॅप्शनमध्ये पुढे लिहिलं, “माझा दिवस सरप्राईज देऊन इतका खास बनवल्याबद्दल शिव ठाकरे तुझे आभार.” रिंकूने शेअर केलेल्या या पोस्टवर शिवने प्रतिसाद देत कमेंट केली आहे. शिवने लिहिलं, “वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅम.”

तर अनेक कलाकारांनी या पोस्टवर रिंकूला शुभेच्छा दिल्या आहेत. रिंकूची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

हेही वाचा… बाबा झाल्यावर वरुण धवनने केली पहिली पोस्ट, लेकीच्या जन्माची दिली गुड न्यूज, म्हणाला…

दरम्यान, रिंकूच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर रिंकूने २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटामधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सैराटच्या यशानंतर रिंकूने कन्नड, हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केलं. रिंकू शेवटची ‘झिम्मा-२’ या चित्रपटात झळकली होती. रिंकूचा आगामी चित्रपट ‘खिल्लार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रिंकूसह ललित प्रभाकरदेखील झळकणार आहे; तर रिंकूचे ‘पिंगा’ आणि ‘आशा’ हे दोन चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame shiv thakare gave surprise to rinku rajguru on her birthday dvr