‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कंकू’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली जानकी म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपल्या अभिनयानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांत अभिनयाची छाप पाडल्यानंतर तिनं वेब सीरिजमध्येही काम केलं. अभिनयबरोबर मृण्मयी शेतीही करते. तसाच तिचा स्वतःचा ‘नील अँड मोमो’ हा साबणाचा ब्रँडही आहे. अशा सर्वगुणसंपन्न असलेल्या या अभिनेत्रीने नुकताच एक सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे; जो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
‘सहज’, असं लिहीत मृण्मयीनं ‘रूपास भाळलो मी’ गाण्यावरील एक सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे; ज्यामध्ये ती सुरुवातीला आपली वेणी बांधताना दिसत आहे. त्यानंतर ती कानातले घालून कपाळावर टिकली लावताना पाहायला मिळत आहे. मग ती केसात एक फूल माळून स्मितहास्य करताना दिसत आहे. व्हिडीओमधली अभिनेत्रीची सुंदरता पाहून बिग बॉस फेम अभिजित केळकर यानं ‘नको गं नको’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरची अर्जुन-सायलीची पहिली भेट कशी होती?, जाणून घ्या
हेही वाचा – टोमॅटोचे भाव कमी होतील का? महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल का? मराठी अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
मृण्मयीचा हा सुंदर व्हिडीओ नेटकऱ्यांनासुद्धा आवडला आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, ‘जगात तू एकटीच सुंदर मुलगी नाहीस हे सत्य असलं तरी तुझ्याइतकं सुंदर कोणीच नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे, ‘तू किती छान दिसतेस.’
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने गायली अंगाई, पाहा व्हिडीओ
दरम्यान, मृण्मयी लवकरच ‘झी मराठी’वरील ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात ती सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. यापूर्वीही ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’च्या आधीच्या पर्वात या अभिनेत्रीनं सूत्रसंचालनाची भूमिका निभावली होती.