‘बिग बॉस मराठी ३’ फेम जय दुधाणे सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. तो एमटीव्ही वरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम ‘स्प्लिट्सविला’मध्येही झळकला होता. जय सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. तसेच तो चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देत असतो.

हेही वाचा – पहिल्यांदा पाळी आल्यावर वडिलांनी केलेली मदत, सुंबुल तौकीर खुलासा करत म्हणाली, “मला शारीरिक बदलांबाबत…”

तुम्ही जर जय दुधाणेचे फोटो नीट पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या हातावर एक टॅटू आहे. त्याच्या हातावरच्या या टॅटूची डिझाईन व अर्थही फारच खास आहे. स्वतः जयने त्याच्या या टॅटूचा अर्थ सांगितला आहे. नुकतंच जय दुधाणेने चाहत्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने जयला ‘तुझ्या हातावर असलेल्या टॅटूबद्दल तू काय सांगशील?’ असा प्रश्न विचारला.

चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना जय म्हणाला, “हा एक जबरदस्त टॅटू आहे. हा टॅटू मी अत्यंत स्ट्राँग व्यक्ती असल्याचं दर्शवतो. तसंच माझ्या मार्गात येणारी संकटं, येणारे चढ-उतार यांना मी समर्थपणे सामोरा जाऊ शकतो, हे दर्शवते. या टॅटूमध्ये असलेले उलट-सुलट त्रिकोण मी माझ्या आयुष्यात किती स्थिर आहे हे दाखवतात.”

दरम्यान, जय खूप फिटनेस फ्रिक आहे. त्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत.