गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गश्मीर महाजनी चर्चेत आहे. वडील रवींद्र महाजनी यांचं निधन झाल्यानंतर त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पण त्यानं ट्रोलर्स देखील सडेतोड उत्तर दिलं. याविषयी तो चाहत्यांबरोबर सुद्धा इन्स्टाग्रावरही बोलत आहे. नुकताच त्यानं ‘आस्क गश फॉर अ मिनिट्स’ सेशनमधून चाहत्यांबरोबर संवाद साधला. यावेळी त्यानं विविध प्रश्नांची उत्तर दिली. असा हा सध्या चर्चेत असणारा गश्मीर एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा क्रश असल्याचं समोर आलं आहे. याबाबत या अभिनेत्रीनं स्वतः खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…अशी बायको सगळ्यांना मिळो” अभिनेता स्वप्नील जोशी ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे आहे. नुकतीच ती खास मैत्रीण अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतबरोबर ‘लोकमत फिल्मी’च्या ‘आपली यारी’ कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी मेघाला तिच्या आवडत्या अभिनेत्याविषयी विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली की, “मला सलमान खान खूप आवडतो. मी हिंदी बिग बॉस करण्यामागचं कारण पण तेच होतं. मी सलमान खानची मोठी चाहती आहे.”

हेही वाचा – “जिच्या पायाला मी स्पर्श करून…” उत्कर्ष शिंदेची अभिनेत्री हर्षदा खानविलकरसाठी खास पोस्ट, म्हणाला…

त्यानंतर मेघाने गश्मीर महाजनी सुद्धा खूप आवडत असल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, “मला गश्मीर खरोखरच खूप आवडतो. तो माझा क्रश आहे. शिवाय मी इतर सेलिब्रिटींचा तितकेच आवडतात.”

हेही वाचा – Video: “माय आता भेटत नाही…”; आई सीमा देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक

दरम्यान, मेघाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर असली तरी राजकारणात सक्रिय झाली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाने मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती केली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss season one winner megha dhade said her crush is gashmeer mahajani pps