केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ६० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तसेच या चित्रपटाने अनेक रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. नुकतंच या चित्रपटाचे एका बॉलिवूड अभिनेत्रीने कौतुक केले आहे.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवली आहे. यात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात दणदणीत कामगिरी करत आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ नाकारणाऱ्या निर्मात्याने केदार शिंदेना केला मेसेज, म्हणाला “माझी बस चुकली, पण…”

Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
preity zinta los anjeles wildfire
लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री; धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली, “देवाचे आभार…”
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

नुकतंच अभिनेत्री मृणाल ठाकूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावर तिने ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याबरोबर तिने या चित्रपटाचे कौतुकही केले आहे.

“बाईपण भारी देवा, कसला कमाल चित्रपट आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. अनेकजण म्हणतात, की हल्ली चांगले चित्रपट कुठे बनतात? त्यांना सांगावेसे वाटते बनतात बॉस!! गेल्या ५ आठवड्यांपासून हा चित्रपट चित्रपटगृहात हाऊसफुल सुरु आहे. नुकतंच हैदराबादमध्ये हा चित्रपट पाहिला, तो देखील हाऊसफुल शो होता. खरंच खूप खूप खूप अभिमान वाटतो. नक्की बघा”, असे मृणालने म्हटले आहे.

mrunal thakur post
मृणाल ठाकूर

“‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने हैदराबादमधील प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. क्या बात है”, अशीही पोस्ट तिने केली आहे. मृणालची ही पोस्ट केदार शिंदेंनी शेअर करत तिचे आभार मानले आहेत.

mrunal thakur post 1
मृणाल ठाकूरची पोस्ट

आणखी वाचा : “आमचा साडेतीन वर्षांचा संसार…” दोनदा घटस्फोट झालेल्या व्यक्तीबरोबर लग्न करणाऱ्या नेहा पेंडसेचे वक्तव्य, म्हणाली “लग्नानंतर स्त्रियांनाच…”

दरम्यान या चित्रपटाने २४ दिवसात ६५.६१ कोटींचा गल्ला जमवला आहे. यामुळे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘वेड’ चित्रपटाने २४ दिवसात ५४.४० कोटींची कमाई केली होती.

Story img Loader