केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या १०० कोटीच्या दिशेनं घोडदौड सुरू आहे. अजूनही चित्रपटाचा जलवा बॉक्स ऑफिसवर कायम आहे. अशातच बॉलीवूडमधील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘तुम्ही तुमचं खरं नाव का लावत नाही?’ चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या…

सोनाली बेंद्रेनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, “खरंच बाईपण लय भारी आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.” शिवाय व्हिडिओत सोनाली बेंद्रे म्हणतेय की, “माझ्याबरोबर तुम्ही ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची स्टारकास्ट पाहत आहात. तसेच केदार सरही आहेत. ५० दिवस झाले तरीही ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटगृहात ठाण मांडून बसला आहे. अजिबात कुठेही हलायचं नाव घेत नाहीये. श्रावण सुरू होतोय मंगळगौरीचा चित्रपट आहेत. माझ्या मते, फक्त हा चित्रपट महिलांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा चित्रपटगृहात जाऊन बघणं खूप जरुरी आहे. मग कोणाची वाट पाहताय, चित्रपटगृहात जा.”

हेही वाचा – ‘पानिपत’ चित्रपटातील क्रिती सेनॉनचा मराठीतला आवाज दिला ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं; अशी झालेली ऑडिशन

सोनाली बेंद्रेनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर केदार शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहेत. तसेच नेटकऱ्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकरीनं लिहिलं आहे की, “मी आधीच पाच वेळा हा चित्रपट पाहिला आहे आणि अजूनही पाहायचा आहे. मला वंदना गुप्ते आणि दीपा परब याचं काम खूप आवडलं.”

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर ‘त्या’ रात्री लेक अभिनयची ‘ती’ कृती पाहून प्रिया बेर्डेंना मिळाली प्रेरणा; किस्सा सांगत म्हणाल्या…

दरम्यान, आतापर्यंत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटानं ७६.०५ कोटी रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. ३० दिवसांत या चित्रपटानं ७०.२० कोटींची कमाई केली होती.