बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या धमाकेदार अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. गोलमाल, सिंघम, सिंबा, चेन्नई एक्सप्रेस, सर्कस असे अनेक चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केले आहेत. उत्तम कथानक, कॉमेडी व धमाकेदार अॅक्शन सीन्सने तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या रोहित शेट्टीने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.

रोहित शेट्टीने त्याच्या मराठी प्रेक्षकांसासाठी खास गिफ्ट आणलं आहे. ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीद्वारे रोहितने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रोहितने त्याच्या सोशल मीडियावरुन चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत ही माहिती दिली आहे. “मी मराठी चित्रपटाची कधी निर्मिती करणार? असा प्रश्न मला माझ्या मराठी चाहत्यांकडून विचारला जायचा. माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी मराठीतील पहिलाच चित्रपट मी घेऊन आलो आहे…”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> रोहित शेट्टीच्या चित्रपटात झळकणार जितेंद्र जोशी, ट्रेलर शेअर करत म्हणाला “रोहित सरांच्या ऑफिसमधून फोन येतो अन्…”

हेही वाचा>> ३० वर्षांनंतर ‘माहेरची साडी २’ येणार? चित्रपटाच्या सिक्वेलबाबत अलका कुबल म्हणाल्या, “मला…”

‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या चित्रपटाचं कथानक शाळा, महाविद्यालयीन जिवनामुळे व्यक्तीची होणारी जडणघडण व आयुष्याला मिळणारं वळण यावर आधारित आहे. एका तरुणाच्या शालेय व कॉलेज जीवनाचा प्रवास या चित्रपटातून पडद्यावर दाखविण्यात आला आहे. रोहित शेट्टीने या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाचं दिग्दर्शन विहान सुर्यवंशी यांनी केलं आहे.

हेही वाचा>> “नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो” प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला “माझ्या पत्नीने…”

रोहित शेट्टीच्या ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या चित्रपटात जितेंद्र जोशी, करण किशोर व अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांच्या मुख्य भूमिका आहेत. याबरोबरच वनिता खरात, प्रसाद जवादे हे कलाकारही चित्रपटात झळकले आहेत. हा चित्रपट १४ एप्रिलला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader