भारताचे महानायक म्हणून ओळखले गेलेलं अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. ११ ऑक्टोबर त्यांचा वाढदिवस. आज ते ८० व्या वयात पदार्पण करत आहेत. आजही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल इतका आहे. या महानायकाने आजवर अनेक चित्रपट केले आहेत. प्रत्येक चित्रपटात त्यांनी वेगळी भूमिका साकारली आहे. बॉलिवूडमध्ये त्याने जवळपास सहा दशकं काम केलं आहे. मात्र त्यांनी मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. १९९४ साली आलेल्या ‘अक्का’ या मराठी चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ बच्चन यांचे मेकअपमन हे मराठी आहेत. गेली अनेकवर्ष ते अमिताभ यांच्याबरोबर ते काम करत आहेत. दीपक सावंत यांनी ‘अक्का’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात बच्चन यांनी काम करावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून ते या चित्रपटात एका गाण्यात दिसले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी जया बच्चन यांनीदेखील काम केले आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटात पहिल्यांदा मराठीत बोलले आहे. या चित्रपटात अजय फणसेकर, सुलभा देशपांडे, प्रशांत दामले यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीधर जोशी यांनी केले होते.

विश्लेषण : बॉलिवूडच्या ‘शहेनशहा’नं भारताला काय दिलं? या वयातही का आहे रसिकांच्या मनावर गारुड?

दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘AB CD’ या मराठी चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एक भूमिका केली होती. नुकताच त्यांचा ‘गुडबाय’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रश्मिका मंदना पाहिल्यान्दाच हिंदी चित्रपटात काम करत आहे. अमिताभ बच्चन आपल्याला ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमातून भेटत असतात.

अमिताभ बच्चन मूळचे उत्तर प्रदेशचे, अभिनयासाठी त्यांनी मुंबई गाठली. सुरवातीला त्यांचे चित्रपट फ्लॉप ठरत होते. यात्रा ‘जंजीर’ चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. ‘काला पत्थर’, ‘शोले’, ‘दिवार’, ‘डॉन’ या सुपरहिट चित्रपटांनी त्यांना स्टारपदी पोहचवले. अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनदेखील आज चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. दोघांनी ‘बंटी बबली’, ‘पा’ चित्रपटात एकत्र काम केले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood megastar amitabh bacchan guest appearance in marathi film akka spg