मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा बॉक्सर पती प्रदीप खरेरा यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मानसी आणि प्रदीप यांनी प्रेम विवाह केला होता. दोघांनी घटस्फोटाच्या वृत्तांवर शिक्कामोर्तब केल्यानंतर ते पोस्ट करत एकमेकांवर टीका करत असतात. ते एकमेकांची नावं पोस्टमध्ये घेत नसले, तरी त्यांच्या पोस्टवरून ते एकमेकांवर निशाणा साधत असल्याचं लक्षात येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी घेतलेला सर्वात…” घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल मानसी नाईकची पोस्ट चर्चेत

मानसी नाईकने आज तिचे काही फोटो शेअर केले आहेत. “मी घेतलेला सर्वात उत्तम निर्णय…स्वतःचं रक्षण करा. मी कधीही हार मानणार नाही” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय. तिची ही पोस्ट चांगली व्हायरल झाली आहे. तिने घटस्फोटाच्या निर्णयावर या कॅप्शनमधून अप्रत्यक्षपणे बोलण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, मानसीची पोस्ट व्हायरल झाल्यावर काही तिचा पती प्रदीप खरेराचा इन्स्टाग्रामवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत त्याने अप्रत्यक्षपणे मानसीला इशारा दिल्याचं म्हटलं जातंय. “खरं तर सगळं मूडवर निर्भर असतं डार्लिंग आणि मला पाठीमागून वार करणाऱ्यांचा सर्वात जास्त राग येतो. जर, मी प्रेमाने डोक्यावर घेऊ शकतो ना, तर मला अपमान करताही येतो,” अशा आशयाचं एक रील प्रदीपने शेअर केलं आहे. प्रदीपने व्हिडीओत मानसीचं नाव घेतलं नसलं तरी मानसीच्या पोस्टनंतर त्याने हा व्हिडीओ शेअर केल्याने त्याने तिच्यासाठीच ही पोस्ट केल्याचं दिसतंय.

घटस्फोटाच्या बातम्या आल्यापासून मानसी आणि प्रदीप खरेराचं सोशल मीडिया वॉर पाहायला मिळतंय. आता प्रदीपच्या या व्हिडीओवर मानसी काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.