मऱाठी अभिनेता पार्थ भालेराव सध्या चांगलाच चर्चेत आहे. लवरकच त्याच ‘बॉईज ४’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान एका मुलाखतीत पार्थने त्याच्या महाविद्यालयातील एक किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “नाचणीची भाकरी, मच्छी फ्राय अन्…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने चुलीवर बनवलं जेवण, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

पार्थ म्हणाला, “मी अजून माझ्या कॉलेजचा दाखलाच घेतलेला नाहीये. कारण मी कॉलेजमधून अजून बाहेरच पडलेलो नाहीये. मी पुण्यामध्ये बीएला होतो आणि पहिल्या वर्षात शिकत होतो. मी पहिल्या वर्षाची दोनदा परिक्षा दिली. दुसऱ्यांदा परिक्षा देऊनही मी नापास झालो. तेव्हा मला काळालं की दोनदा परिक्षा देऊनही आर्टस मला जमत नाहीये. आपण यासाठी बनलेलोच नाहीये. त्यानंतर मी महाविद्यालयाचं शिक्षण थांबवलं ते आजपर्यंत थांबवलेलच आहे आणि माझा महाविद्यालयाचा दाखला अजून तिथेच आहे.”

पार्थ पुढे म्हणाला, “मी जास्त कॉलेजला जायचो नाही. फिलॉसॉपी माझा आवडता विषय होता. कॉलेजमध्ये हा विषय सहसा कोणी घेत नाही. त्यामुळे या विषयाच्या वर्गात ४ते ५ विद्यार्थी असतात. मी सहा-सहा महिने कॉलेजला जायचो नाही. एकदा जेव्हा मी फिलॉसॉपीच्या वर्गात जाऊन बसलो तेव्हा मॅडमनी मला विचारलं तू कोण आहेस. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी अभिनय करत करत शिक्षण घेतो. पण त्यांना अभिनय करत करत कुणी फिलॉसॉपी शिकू शकतं यावर विश्वासच बसला नव्हता.”

हेही वाचा-“…म्हणून मी अभिषेक जावकरशी लग्न केले”, अखेर प्रार्थना बेहेरेने उघड केले गुपित

‘बॉईज ४’ चित्रपट २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पार्थ भालेरावबरोबर प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ व ‘बॉईज ३’ हे तिन्ही चित्रपट सुपरहिट ठरले होते. आता चित्रपटाच्या चौथ्या भागातही कॉलेजवयीन मुलांची धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boyes 4 actor partha bhalerao told the his college certificate story dpj
Show comments