अफलातून अभिनयाच्या जोरावर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख त्याच्या ‘वेड’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलेल्या रितेशच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या जिनिलीया देशमुखनेही सगळ्यांना वेड लावलं आहे. पहिल्या दिवसापासूनच कोटींची कमाई करणाऱ्या ‘वेड’चा बॉक्स ऑफिसवर बोलबोला कायम आहे.

‘वेड’ चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही भरभरुन प्रेम मिळत आहे. या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटीही रितेशच्या सिनेमाचं कौतुक करत आहेत. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहन मापूसकर यांनीही या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. “वेड लावून झालं, आता…वाळवी पसरवूयात…”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Premachi Goshta
Video : सई दूर गेल्याने मुक्ता संतापली, सागरच्या थेट कानशि‍लात लगावली; पाहा मालिकेचा नवा प्रोमो
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gashmeer Mahajani on Chhaava Controversy
Video: एकाच चित्रपटात दुहेरी ऐतिहासिक भूमिका करणारा गश्मीर महाजनी ‘छावा’च्या वादाबद्दल म्हणाला, “माझा अनुभव…”
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
Walmik Karad, Dhananjay Munde
“फरार असताना वाल्मिक कराडने संपत्तीचं…”, ठाकरे गटाला वेगळाच संशय; धनंजय मुंडेंचा उल्लेख करत म्हणाले…
Kshitee Jog
“सरसकट निर्मात्यांना अक्कल नसते….”, क्षिती जोग निर्माती होण्याआधी ‘असा’ करायची विचार; स्वत:च सांगत म्हणाली, “हेमंत फार हळवा होऊन…”

हेही वाचा>> अंगप्रदर्शन करणं महागात पडलं, उर्फी जावेदला मुंबई पोलिसांची नोटीस

हेही पाहा>> …अन् राणादाने पाठकबाईंना सगळ्यांसमोरच उचललं; अक्षया-हार्दिकची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, पाहा फोटो

रोहन मापूसकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. ते दिग्दर्शक, निर्माते व कास्टिंग दिग्दर्शकही आहेत. ‘वेड’ या रितेश देशमुखच्या चित्रपटाचे ते कास्टिंग दिग्दर्शक आहेत. शिवाय ‘वाळवी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं कास्टिंगही त्यांनीच केलं आहे. या पोस्टमधून त्यांनी ‘वाळवी’ पाहण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन केलं आहे.

हेही वाचा>> Bigg Boss 16: “मेरी जान, मेरा दिल”, अब्दू रोझिक घराबाहेर पडताच ढसाढसा रडला शिव ठाकरे, व्हिडीओ व्हायरल

१३ जानेवारीला प्रदर्शित झालेला ‘वाळवी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, अनिता दाते, स्वप्नील जोशी व शिवानी सुर्वे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

Story img Loader