‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा शो सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. या शोच्या आधीच्या दोन सीझनलाही प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळाला होता. आताही या शोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या आगामी भागात अभिनेत्री अमृता खानविलकर हजेरी लावणार आहे. यावेळी तिने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कार्यक्रमात अवधूत गुप्ते हा अमृता खानविलकरला विविध प्रश्न विचारतो. त्यावेळी अवधूत हा प्रसाद ओकचा फोटो दाखवतो आणि याच्याबद्दल काय वाटतं, असे विचारतो. त्यावर अमृता खानविलकरने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “जेव्हा प्रसाद ओक…” मानसी नाईकने ‘चंद्रमुखी’बद्दल केलेल्या ‘त्या’ दाव्यावर अमृता खानविलकरचे थेट उत्तर

“मला आजही असं वाटतं की, दौलत देशमाने हे पात्र त्यानेच (प्रसाद ओक) साकारायला हवं होतं”, असे अमृता यावेळी म्हणाली. तिचे हे उत्तर ऐकून अवधूत गुप्तेला धक्का बसला.

त्यावर अवधूत गुप्तेने हा “आता तुला भीती वाटत नाही का? देशमाने आता ऐकतील आणि खरं देशमाने (आदिनाथ कोठारे) हे पात्र ज्यांनी साकारलं त्यांना वाईट वाटेल”, असे त्याने म्हटले. त्यावर अमृताने मात्र काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

दरम्यान प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकरने साकारली होती. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे झळकला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandramukhi movie lead character should have been played by these actor not adinath kothare said amruta khanvilkar watch video nrp