चांद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लॅंडिंग केल्यावर संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहेत. चांद्रयान ३ ला मिळालेलं यश ही देशातील प्रत्येकासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. आता जगभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतं आहे. बॉलीवूडसह अनेक मराठी कलाकारांनी इस्त्रोला शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “ते दोन सीन्स भावनिकदृष्ट्या…”, जुई गडकरीने केला ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल खुलासा; म्हणाली, “जेव्हा पूर्णा आजी…”

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतनेही इस्त्रोकडून करण्यात आलेलं चांद्रयान ३ चं प्रक्षेपण लाइव्ह पाहिलं. भारताला यश मिळाल्यानंतर अभिनेत्री काहीशी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. चांद्रयान ३ चं सॉफ्ट लॅंडिंग झाल्यावर वैज्ञानिकांनी एकच जल्लोष केला, याची झलक पूजा सावंतने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या डोळ्यात हे प्रक्षेपण पाहताना आनंदाश्रू आले होते.

हेही वाचा : ‘हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला ‘या’ खास व्यक्तीने गिफ्ट दिले होते पैंजण; म्हणाली, “आजवर एकाही मुलाने…”

पूजा सावंत हा भावुक व्हिडीओ शेअर करत लिहिते, “भारताचा हा ऐतिहासिक क्षण आणि त्या मागची उत्कंठा ,स्वाभिमान, प्रेम हे कायमचं camera मध्ये कैद करायचे ठरवलं… एका कार्यक्रमासाठी बाहेर असल्यामुळे हा क्षण अनुभवण्यासाठी माझ्यासोबत कोणीच नव्हतं… पण खर सांगू का ? काल कुणीच एकटं नव्हतं… काल आपण सगळे ‘एक’ होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलो. इस्त्रोचं त्रिवार अभिनंदन…’कलाम’ सर आम्हाला माहीत आहे.. तुम्ही जिथे कुठे असाल , खुप खुश असाल… we miss you वंदे मातरम!”

हेही वाचा : Seema Deo Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन, सोज्ज्वळ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

पूजा सावंतने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “भारत माता की जय हो”, “वंदे मातरम्” अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, पूजाप्रमाणे सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, अलका कुबल, सायली संजीव, प्रशांत दामले, शिव ठाकरे, राहुल देशपांडे, सोनाली कुलकर्णी यांसह अनेक मराठी कलाकारांनी चांद्रयान ३ साठी शुभेच्छा दिल्या आहेत.