काही कलाकारांची त्यांच्या कामामुळे एक वेगळी ओळख निर्माण होत असते. अशा कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) या आहेत. २०२४ च्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.

कान आंतरराष्ट्रीय महोत्सवात छाया कदम यांच्या भूमिका असलेले ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ व ‘सिस्टर मिडनाईट’ असे दोन चित्रपट दाखविण्यात आले होते. पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वांनी उभे राहून दाद दिल्याचे पाहायला मिळाले.

hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”

आता नुकतीच त्यांनी ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना विचारण्यात आले की, सिनेमामध्ये जेव्हा यायचं ठरवलं त्यावेळी आपलं दिसणं हे इतरांसारखं नाहीये, साचेबद्ध नाही, याची जाणीव झाली का? आणि जेव्हा झाली तेव्हा तुम्ही त्याच्याशी कसं जुळवून घेतलं? यावर बोलताना छाया कदम म्हणतात, “कलाकार जेव्हा एखाद्या नाटक, मालिका, सिनेमात दिसतो तेव्हा बघणाऱ्यांना वाटतं की, प्रवास इथून सुरू झालाय; पण तसं नसतं. तर त्याच्या आधीचा प्रवास खूप मोठा असतो. मी प्राध्यापक वामन केंद्रे यांचं २००१ मध्ये वर्कशॉप केलं होतं. २००१ पासून काम मिळविण्याची माझी धडपड सुरूच होती. त्यावेळी थोडंसं कठीण होतं. आता फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमांतून तुम्ही तुमचं काम पोहोचवू शकता; तेव्हा तसं नव्हतं. लोकांना ओळख पटवून देण्यासाठी पाच वर्षं गेली.”

काय म्हणाल्या छाया कदम?

पुढे त्या त्यांच्या दिसण्याविषयी म्हणतात, “मला माझ्या दिसण्याविषयी असे कधीच प्रश्न पडले नाहीत. कारण- ‘झुलवा’ माझं जे पहिलं नाटक होतं, त्या नाटकात काम करणारे कलाकार सगळे माझ्यासारखे दिसणारेच होते. वामन केंद्रे सरांनी फक्त आमची प्रतिभा पाहिली होती. त्या गावातील माणसं जशी दिसतील, त्यांची जशी शरीरयष्टी आहे. त्यांना तशीच माणसं हवी होती. त्या रिहर्सलमध्ये, सरांच्या वर्कशॉपमध्ये किंवा त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जी माणसं जोडली गेली, त्यांच्याबरोबर राहून मला माझ्या दिसण्याविषयी प्रश्न पडले नाहीत.”

छाया कदम स्वत:विषयी अधिक स्पष्ट करताना म्हणतात, “मला असं कधी वाटलं नाही की, थोडसं गोरं असायला पाहिजे होतं किंवा थोडंसं पोट आत पाहिजे होतं. माझं आधीपासून ठरलेलं की, मला माणसांची गोष्ट सांगायची आहे आणि त्यामुळे माणूस दिसणं महत्त्वाचं आहे. माझ्या जवळचे जे दिग्दर्शक आहेत, ते मला हेच सांगतात की, छाया तू आहे तशीच राहा. त्याच्यात काहीतरी पात्र दिसतं. कारण- सगळ्याच बारीक असतील, तर सगळ्याच सारख्या दिसतात, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे मला हा माझा प्लस पॉइंट वाटतो की, मी अशी दिसते. मला भारी वाटतं की, मी सावळी आहे.”

हेही वाचा: Video : कोकणातील संस्कृती, बाप्पाला गाऱ्हाणं अन्…; ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने दाखवली गावच्या विसर्जनाची झलक

आपली इंडस्ट्री सौंदर्याभोवती फिऱणारी आहे. याबरोबरच ज्या इतर क्षेत्रांतील अनेक मुली कलाकारांना बघतात, त्यावेळी त्यांना वाटतं की, आपण यांच्यासारखं दिसलं पाहिजे. तर, अशा मुलींना काय सांगशील, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटले, “प्रत्येकानं आपण जसे आहोत तसं स्वत:ला स्वीकारलं पाहिजे. स्वत:वर प्रेम करता आलं पाहिजे. हे पण सांगेन की, जर तुम्हाला इंडस्ट्रीत स्वत:वर काम करायचं आहे. वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत. तर तुम्ही या गोष्टी अभ्यास म्हणून करा. जर मला अशी एखादी भूमिका आली की, ग्लॅमरस दिसायचं आहे. मी त्यावेळी विचार करेन. दीपिका पदुकोण, आलिया भट्ट व इतर अभिनेत्री कशा वर्कआऊट करतात किंवा आपल्या दिसण्यावर लक्ष देतात हे मी डोळ्यांसमोर ठेवेन; पण प्रत्येक वेळी मी तशी तयार होऊन वगैरे निघेन, असं होणार नाही.”

दरम्यान, ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील छाया कदम यांच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.