Chhaya Kadam Shares Video: छाया कदम या त्यांच्या अनेक दर्जेदार भूमिकांमुळे ओळखल्या जातात. ‘सिस्टर मिडनाईट’, ‘लापता लेडीज’, ‘झुंड’, ‘हम्पी’, ‘रेडू’, अशा अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचा समावेश आहे. छाया कदम सध्या त्यांच्या कोणत्या चित्रपटांमुळे नाही तर त्यांच्या एका व्हिडीओमुळे चर्चत आल्या आहेत.

छाया कदम सध्या कोकणात गेल्या असल्याचे त्यांच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काही महिला त्यांचा सत्कार करत असल्याचे पाहायला मिळाले होते. या व्हिडीओमध्ये त्या डान्स करतानादेखील दिसल्या होत्या. आता त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

छाया कदम यांनी शेअर केला व्हिडीओ

छाया कदम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या फणसाची गरे खाताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे त्या मालवणी भाषा बोलत आहेत. त्या म्हणतात की आम्ही उसाचा रस पिण्यासाठी इथे थांबलो होतो. आम्ही चर्चा करत होतो की फणसाचा छान वास येत आहे. पुढे तिथे असलेल्या एका महिला व पुरूषाला व्हिडीओमध्ये दाखवत त्या म्हणतात की त्यांनी आम्हाला गरे खायला दिले. त्यांना हे दुसरे कोणी तरी दिले होते. त्यांनी आम्हाला खायला दिले. आमची कोकणातील माणसं अशी आहेत, असे म्हणत त्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच त्या गरे खाण्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. हा पहिला गरा असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. व्हिडीओ शेअर करताना छाया कदम यांनी ‘पहिलो गरो’ अशी कॅप्शन दिली आहे. तसेच पुढे हार्ट इमोजी शेअर केली आहे. अभिनेत्री या व्हिडीओमध्ये साध्या पेहरावात दिसत आहेत.

छाया कदम यांच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “कोकणातील माणसं गऱ्यासारखीच”, “छाया ताई माझ्या वाट्याचो एक खा गरो”,”गरे जिवाक बरे”, “कोकणची माणसं साधी भोळी”, “या वर्षी कोकणातील फणस कान्स फिल्म फेस्टिव्हिलमध्ये घेऊन या”, “छाया ताई तुम्हीपण फणसासारखे आहात”, “माका गरो पाहिजेत”, “कसली भारी मालवणी बोलतंय तू बाई”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे. अनेकांनी छाया कदम यांच्या मालवणी भाषेचे अनेकांनी कौतुक केले आहे. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केले आहे.

दरम्यान, आगामी काळात छाया कदम कोणत्या चित्रपटातून भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.