मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांच्या यादीत चिन्मय मांडलेकर याचे नाव घेतले जाते. त्याने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चिन्मय फक्त उत्कृष्ट अभिनेता नसून तो लेखक, दिग्दर्शक, निर्मिता देखील आहे. सध्या ‘सुभेदार’ चित्रपटातील त्याच्या कामाच कौतुक केलं जातं आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पाहायला मिळतं आहे. अलीकडेच ‘सुभेदार’ या चित्रपटाच्या निमित्तानं त्यानं ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेल मुलाखत दिली. यावेळी त्यानं एनएसडीमधून आल्यानंतर अभिनेता सुबोध भावेमुळे सात महिने घरी बसून राहिल्याचा एक किस्सा सांगितला.

हेही वाचा – Video: ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर अशोक सराफ झाले भावुक; नक्की काय घडलं? पाहा

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

चिन्मय म्हणाला की, “मी मुंबईत असं ठरवून आलो होतो की, फक्त चित्रपट करेन. मला टेलिव्हिजन करायचं नाही. पण आल्यानंतर कळालं की, मराठी अभिनेता, अभिनेत्री जे कुठंतरी आधी नोकरी करून मग नाटक करायचे किंवा जुजबी चित्रपट करायचे. त्यांच्यासाठी एक नवीन उद्योग क्षेत्र जन्माला आलं आहे, ते म्हणजे मालिका. कारण मी जेव्हा एनएसडीला गेलो होतो, तेव्हा मराठी मालिका क्षेत्र एवढं मोठं झालं नव्हतं. फक्त ‘आभाळमाया’ मालिका सुरू झाली होती. त्यामुळे मी ‘आभाळमाया’ मालिका कधी पाहिलीच नाही. मी जेव्हा एनएसडीमधून परत आलो तेव्हा ‘आभाळमाया’ मालिकेचं दुसरं पर्व संपलं होतं. या मधल्या तीन वर्षात पुलाखालून खूप पाणी गेलं होतं आणि मराठी कलाकार रोज उठून शूटिंगला जायला लागले होते. हे मला एनएसडीमधून आल्यानंतर पहिल्या चार-पाच दिवसांत कळालं होतं.”

हेही वाचा – “…तर मी ट्रॉफी जिंकले नसते”, अभिनेत्री मेघा धाडेनं बिग बॉसच्या आठवणींना दिला उजाळा

“मुंबईत असल्यामुळे रिअ‍ॅलिटी चेक लगेच होतो. मी लगेच पलटी मारली, जे मिळेल ते काम करू असं ठरवलं. त्यावेळी ‘वादळवाट’ नावाची मालिका आली होती. तेव्हा माझ्या मित्राने मला सांगितलं, ऑडिशन देऊ ये. मी ऑडिशन दिलं. माझी निवड झाली आणि मला असं सांगण्यात आलं की, सुबोध भावे नावाचे एक अभिनेते आहेत, त्यांच्याबरोबर तुमचा ट्रॅक आहे. त्यावेळेस मला सुबोध भावे कोण हे माहित नव्हतं. मी म्हटलं कधी सुरू होणार. तर ते म्हणाले, होईल सुरू. तेव्हा सुबोध भावे इतका व्यस्त होता की, तो एकावेळेला चार मालिका करायचा. ‘वादळवाट’, ‘जगावेगळी’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि ‘अवंतिका’ अशा चार मालिका तो करायचा. शिवाय सुबोध चित्रपट, नाटक करत होता. मग माझं असं झालं की, माझी निवड झालीये आणि हे कोण तरी सुबोध भावे आहेत, ज्यांच्याकडे तारखा नाहीयेत. त्यामुळे आपण घरी बसलोय.”

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणावर आधारित चित्रपटाचं शूटिंग केव्हा सुरू होणार? प्रसाद ओकनं व्हिडीओ केला शेअर

पुढे चिन्मय म्हणाला की, “मला अजूनही आठवतंय, ३ सप्टेंबर गणेश चतुर्थी होती. मला पहिला फोन आला की, तुमची निवड झालीये. तेव्हा मी खूप आनंदी होतो. आणि साधारण, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे सात महिने मी घरी बसून होतो. कारण सुबोध भावेकडे तारखा नव्हत्या. बरं निवड झाली होती, भूमिका चांगली होती. ‘वादळवाट’ ज्यांची पहिली मालिका होती, त्यांच्याकडून करार करून घेतला होता की, दुसरं काही काम करणार नाही. त्यामुळे मी वाटत पाहत राहिलो.”

हेही वाचा – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा गश्मीर महाजनी आहे क्रश; म्हणाली…

“पण थांबून करायचं काय. तर मी एक ‘जोकर’ नावाच नाटक केलं. त्याचा एक प्रयोग झाला. त्यावेळी ‘वादळवाट’चे लेखक अभय परांजपे त्यांनी तो प्रयोग पाहिला. त्यांनी मला विचारलं, हे लिहीलंय कोणी? म्हटलं, आम्हीच लिहीलंय इंप्रोवाइज केलंय. काही लिहीलं वगैरे नाहीये. ते म्हणाले, तू लिहिलंय का? मी म्हटलं, ९० टक्के मीच लिहीलंय. त्यानंतर ते म्हणाले, मग तू लेखक आहेस. बरं तू लिहायला सुरुवात का करत नाहीस? माझं असं झालं, मोबाईलच बिल भरायचं आहे, बाबांकडे किती पैसे मागणार आणि हे सुबोध भावे काही तारखा देत नाही. म्हटलं, चला जोपर्यंत अभिनयाचं काम सुरू होतं नाही, तोपर्यंत लिहिण्याचं काम करूया. तेव्हापासून मी लिहायला सुरुवात केली,” असं चिन्मय म्हणाला.

Story img Loader