अफलातून नृत्याच्या जोरावर मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा कोरिओग्राफर म्हणजे आशिष पाटील. अनेक गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन करुन त्याने मनोरंजनविश्वात ठसा उमटवला आहे. लावणी किंग अशी ओळख मिळवणाऱ्या आशिषला मात्र वैयक्तिक आयुष्यात अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आशिषने त्याच्या खडतर प्रवसाबाबत भाष्य केलं आहे.

आशिषने ‘राजश्री मराठी’च्या त्याची गोष्ट या कार्यक्रमात मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने कला क्षेत्र व वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. आशिष म्हणाला, “बालपणी माझा प्रवास खूप खडतर होता. मला एकही मित्र नव्हता. समाजाबरोबरच कुटुंबातील काही व्यक्तींनीही मला समजून घेतलं नाही. त्यामुळे मी एकटा पडलो होतो. मला फक्त माझीच साथ होती. अनेक चुकांतून शिकत मी इथपर्यंत पोहोचलो आहे.”

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
N 11 vulture released from Tadoba project reached Tamil Nadu after traveling 4000 kms but was electrocuted and died
चार हजार कि.मी. उड्डाण, पाच राज्यांतून प्रवास; तामिळनाडूत घेतला अखेरचा श्वास…
1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

हेही वाचा>> अमोल कोल्हेंना दुखापत! घोड्याचा पाय दुमडला अन्…; ‘शिवपुत्र संभाजी’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान नेमकं काय घडलं?

आशिष पुढे म्हणाला, “पायात घुंगरू बांधायचे असतील आणि नाचायचं असेल, तर घरातून बाहेर पड. सातवीत असताना मी घरातून बाहेर पडलो. घरातून बाहेर पडल्यानंतर मी तीन दिवस स्टेशनवर राहिलो होतो. परंतु, त्यानंतर माझे वडिलच मला घ्यायला आले. पण, तेव्हा त्यांच्यावर समाजाचा दबाव होता. लोक काय म्हणतील? ही चिंता त्यांना सतावायची, या गोष्टींची जाणीव मला आता होत आहे. माझं आईबरोबर फार जवळचं नातं आहे. मी तिच्याबरोबर सगळं शेअर करायचो. तिचा मला पाठिंबा होता.”

हेही वाचा>> शरद पवारांनी सिनेमागृहात जाऊन पाहिला ‘महाराष्ट्र शाहीर’, प्रतिक्रिया देत म्हणाले, “अंकुश चौधरी…”

“या सगळ्या प्रवासात मी नैराश्यातही गेलो होतो. त्यावेळी मी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्नही केला होता. एकवेळ होती, जेव्हा कोणीतरी मित्र असावा, असं मला वाटतं होतं. माझ्या मनातील गोष्टी मला आईबरोबही बोलता येत नव्हत्या. मी गणपती बाप्पाला खूप मानतो. त्यामुळे तेव्हा मी टिटवाळाच्या मंदिरात गेलो होतो. मी मंदिरात बसलो होतो आणि माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. तिथे एक पुजारी आले आणि त्यांनी मला समजावलं. तेव्हापासून माझं आयुष्य बदललं. प्रत्येकाचा जन्म काही कारणास्तव झाला आहे. ते कारण शोधण्याचा प्रयत्न कर. प्रत्येकाल अर्धनारीचं वरदान मिळत नाही, तुला ते मिळालं आहे. त्यानंतर मी सकारात्मक विचार करू लागलो,” असंही आशिषने पुढे सांगितलं.

हेही वाचा>> रितेश देशमुखचा ‘वेड’ पाहून विवेक ओबेरॉय भारावला, पोस्ट शेअर करत म्हणाला…

“आपण जे करतोय ते थांबवावं, असं कधी वाटलं का?” असा प्रश्न आशिषला विचारला गेला. यावर उत्तर देत तो म्हणाला, “माझं शिक्षण बीएसी आयटीमध्ये झालं आहे. त्यामुळे मी त्याच क्षेत्रात नोकरी करावी अशी वडिलांची इच्छा होती. तेव्हा मी वडिलांच्या विरोधातही गेलो होतो. मी लहानपणापासूनच बालनाट्य वगैरे करायचो. मी जे करतोय ते कधीच थांबवण्याचा विचार मी केला नाही. पण मला स्वत:ला संपवावसं वाटलं. मी तीनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. लावणी किंवा क्लासिकल नृत्य करणाऱ्या अनेक पुरुषांची हीच कथा आहे. पण चांगलं कर किंवा वाईट लोक दोन्ही बाजून बोलतात. त्यामुळे मलाही खूप विरोध पत्करावा लागला आहे.”

Story img Loader