सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतमधील त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या या आत्महत्येमुळे मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी काही व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ज्या एन डी स्टुडिओमध्ये देसाई यांनी आत्महत्या केली त्याच स्टुडिओमध्ये त्यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- “नितीन देसाईंना अनेकांनी ब्लॅकमेल केलं”, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?

नितीन देसाई यांनी ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास, हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. भविष्यात अनेक प्रोजक्टवर त्यांना काम करायचं होतं. मात्र, आत्महत्येसारख टोकांच पाऊल उचलल्यामुळे नितीन देसाई यांची ती स्वप्न अपूर्णच राहिली. देसाई यांचे जवळचं मित्र प्रसिद्ध कोरिओग्राफर सुभाष नकाशे यांनी त्याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा- “माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार…”, नितीन देसाईंची शेवटची इच्छा काय होती? ND स्टुडिओतील कर्मचाऱ्याचा खुलासा

नकाशे म्हणाले, मी नितीन यांच्याबरोबर २००६ पासून काम करत होतो. त्यांच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर मला विश्वासच बसला नाही. मी सुन्न झालो होतो. कारण मार्चमध्ये त्यांच्या मुलीचं लग्न याच स्टुडिओमध्ये झालं होतं. आम्ही अनेकदा त्यांच्या पुढच्या स्वप्नांवरही चर्चा केली होती. त्यांना मोठं मोठे म्युझिकल शो करायचे होते. डान्स इन्स्टिटयूट करायचे होते. या स्टुडिओत आम्ही डान्स इन्स्टिटयूट तयार करणार होतो. अनेकांना डान्स शिकवून त्यांना पॅक्टिकल ज्ञान देण्याचं त्यांच स्वप्न होतं.

हेही वाचा- “माझा दादा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होता अन्…” हेमांगी कवीने नितीन देसाईंच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाली, “असा निर्णय घेताना…”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितीन देसाई यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं होतं. त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्यामागे हेच कारण असल्याचं ही सांगितलं जात आहे. नितीन देसाई यांच्या एन. डी. स्टुडिओवर तब्बल २४९ कोटींचं कर्ज असल्याची बाब आता समोर आली आहे. त्यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाईही प्रलंबित होती.