मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीत एक नावाजलेला चेहरा म्हणून अभिनेते शिवाजी साटम यांना ओळखले जाते. सोनी वाहिनीवरील ‘सीआयडी’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. यात त्यांनी एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारली होती. सीआयडीमधील ‘कुछ तो गडबड है’ या डायलॉग ऐकला तर आजही शिवाजी साटम यांचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. पण तुम्हाला माहितीये का, अभिनेते शिवाजी साटम यांची सूनही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने तिच्या सासऱ्यांबद्दल भाष्य केले.

अभिनेते शिवाजी साटम यांच्या सूनेचे नाव मधुरा वेलणकर असे आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर आणि रजनी वेलणकर यांची कन्या आहे. मधुरा ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. नुकतंच मधुराने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिची लव्हस्टोरी सांगितली. त्याबरोबर तिने तिच्या सासऱ्यांबद्दलही भाष्य केले.
आणखी वाचा : “माझे बाबा प्रदीप वेलणकर…”; लेकीने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “ते नोकरी सांभाळून…”

Maharashtrachi Hasyajatra Fame Actress
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
savita malpekar bald look in kaksparsh praises Mahesh Manjrekar
“महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…
donald trump who is Vivek Ramaswamy
ट्रम्प मंत्रिमंडळात महत्त्वाचे पद मिळालेले अब्जाधीश विवेक रामास्वामी कोण आहेत? त्यांचे भारताशी काय नाते? वाचा सविस्तर
star pravah this marathi actor enters marathi serial subhavivah
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री! पोस्ट शेअर करत सांगितलं नव्या भूमिकेचं नाव, म्हणाला…
marathi actress wedding photo
‘पुन्हा सही रे सही’ नाटकातील अभिनेत्रीचं थाटामाटात पार पडलं लग्न! यापूर्वी लोकप्रिय मालिकेत साकारलेली भूमिका, पाहा फोटो
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो

“मी मधुरा वेलणकर आणि साटम अशी दोन्ही आडनाव लावते. माझा आणि अभिजीतचा प्रेमविवाह झाला आहे. आम्ही एका आंतर महाविद्यालयीन स्पर्धेवेळी भेटलो. माझ्या घरी फार लपवाछपवी होत नाही. त्यामुळे मी दोन महिन्यांनी माझ्या बहिणींना याबद्दल सांगितलं. त्यानंतर पाचव्या महिन्यात मी आई-बाबांना मला हा आवडतोय, असं सांगितलं. त्यावेळी मी १४ वीत शिकत होते. त्यानंतर अभिजीतनेही त्याच्या घरी सांगितले.

माझे बाबा किंवा माझे सासरे यांनी एकमेकांबरोबर कधीही काम केलं नाही. पण ते दोघेही या क्षेत्रात बरीच वर्ष आहेत. ते एकमेकांना ओळखत होते. एक घर म्हणून ते चांगले आहेत. माणसं चांगली आहेत, याचा अंदाज होता. त्यानंतर मग ८ वर्ष आम्ही एकत्र होतो. शेवटी मग आम्हाला सर्वांनी लग्न करा असं सांगितलं. २००१ ला मी अभिला हो म्हणाले आणि २००९ ला आम्ही लग्न केले. मग त्यानंतर आम्ही हापूस चित्रपट शूट केला.

यापूर्वीही मी सासऱ्यांबरोबर एका चित्रपटात काम केले होते. मला सासूबाई नाहीत. त्यामुळे लग्नानंतर तीन पुरुषांमध्ये मी बाई जाणार होते आणि आमच्याकडे याच्या विरुद्ध स्थिती होती. मी ब्राह्मण आणि ते मराठा आहेत. पण मला मासांहार करण्याची सवय होती. त्यामुळे फारसा फरक जाणवला नाही. माझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठीही काही गोष्टी बदलल्या होत्या. त्यामुळे घरात माझं छान वेलकम झालं”, असा किस्सा मधुरा वेलणकरने सांगितला.

आणखी वाचा : “या देशाची ओळख जेव्हा…”, नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

दरम्यान मधुरा वेलणकर आणि शिवाजी साटम यांनी ‘हापूस’ या चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा मुलगा अभिजीत साटमने केले होते. या चित्रपटात सुबोध भावे, मकरंद अनासपुरे, पुष्कर श्रोत्री, सुलभा देशपांडे, विद्याधर जोशी असे अनेक कलाकार होते.