‘सीआयडी’मध्ये एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारून अभिनेते शिवाजी साटम खूप लोकप्रिय झाले. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. शिवाजी साटम यांना अभिजीत नावाचा मुलगा आहे, तो अभिनेता आहे. तर त्यांची सून मधुरा वेलणकर ही देखील अभिनेत्री आहे. अभिजीत व मधुरा यांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं होतं. मधुराने लग्न, जबाबदाऱ्या आणि सासऱ्यांशी असलेल्या बाँडिंगबद्दल भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मधुरा वेलणकर व अभिजीत साटम यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलताना मधुरा म्हणाली, “माझ्या माहेरी आम्ही चौघी जणी आणि बाबा एकटे होते, सासरी आल्यावर हे तिघे जण आणि मी एकटी होते. या घरात बाई कोणीच नाही याचं मला दडपण होतं. पण जबाबदारीचं टेन्शन कधीच आलं नाही, कारण माझ्या सासऱ्यांचं घरात खूप लक्ष असतं. त्यांच्याकडून मी काही गोष्टी शिकले. पुरुष असून, ‘सीआयडी’चं शूटिंग चालू असूनही घरात काही संपलंय का? मुलं काय खातायत? ते बिलं भरणं या सगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष असायचं. त्यामुळे नकळत त्यांच्याकडून काही गोष्टी मी शिकले.”

अभिनय सोडून केली शेती, चार वर्षांची मेहनत पुरात वाहून गेल्याने अभिनेता झाला कर्जबाजारी, म्हणाला, “मी २० एकर…”

पुढे मधुरा म्हणाली, “मी अभिनेत्री आहे आणि आधीच काम करतेय हे माहीत असल्यामुळे मी सकाळी उठून सात वाजता चहा करून द्यावा अशी अपेक्षा माझ्याकडून केली गेली नाही. मी रात्री उशीरा आले तर सकाळी १० पर्यंत झोपायचे. माझे सासरे स्वतः चहा करून घ्यायचे, कामावर बाई आली तर काय करायचं हे तिला सांगायचे. त्यांनी मला मुलीसारखंच वागवलं, सूनेसारख्या अपेक्षा माझ्याकडून कधीच केल्या नाहीत.” सासरे अभिजीतला रोज फोन करत नाहीत, पण मला करतात असंही तिने सांगितलं.

अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता नंदाला भेट दिला जुहूतील आलिशान बंगला, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी

मधुराने चुलत सासूशी असलेल्या नात्याबद्दलही सांगितलं. “आजही मी माझ्या चुलत सासूबाईंना हक्काने फोन करते की मला तुझ्याहातचं चिकन खायचंय बनवून दे. माझं डोकं दुखत असेल तर मी तिच्या मांडीवर डोकं टेकवणार आणि आज मी काहीच करणार नाही असं तिला सांगते,” असं मधुरा म्हणाली.

घरात कोणाचे लाड जास्त होतात याबद्दल मधुरा म्हणाली, “माझे सासरे सर्वांचेच लाड करतात. सध्या तरी आमच्या मुलाचे लाड जास्त होतात. माझं आणि सासऱ्यांचं माझ्या लग्नानंतर बाँडिंग झालं. लग्नाआधी ते माझ्याशी फार बोलायचे नाहीत. ते खूप मोकळ्या स्वभावाचे नाहीत. मला एक आवर्जून सांगावं वाटतं की मी येण्याआधीच घरात बाईला कोणत्या गोष्टी लागतील हे बदल त्यांनी करून घेतले होते. माझ्या लग्नानंतर एकत्र राहून हळूहळू आमचं बाँडिंग चांगलं झालं. मी माझ्या सासऱ्यांबरोबर दोन सिनेमे केलेत, ज्यात ते माझे वडील होते.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cid fame shivaji satam daughter in law actress madhura velankar talks about their family bonding hrc