ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं. पुणे जिल्ह्यातील आंबी गावात फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. ते ७४ वर्षांचे होते. मराठीतील देखणा अभिनेता अशी ओळख असलेल्या रवींद्र महाजनींच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी स्मार्ट आहे, पण बाबा…”, देखण्या रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरने केलेलं वक्तव्य

“आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली,” असं ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

“आपल्या संपन्न अभिनय कलेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रविंद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झालेली आहे. महाजनी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” असं शरद पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही रवींद्र महाजनींना श्रद्धांजली वाहिली आहे. “मराठी चित्रपटसृष्टीत चतुरस्त्र अभिनेता म्हणून यशस्वी कारकीर्द गाजविणाऱ्या रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अत्यंत दुःखी झालोय. उत्तुंग अभिनयासह विविध भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या गुणवान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली!” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, रवींद्र महाजनींचा मृतदेह तळेगाव दाभाडे इथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवला जाईल, त्यानंतर अंत्यसंस्कार केले जातील. तसेच मृत्यूचं कारणही तेव्हाच कळेल.