प्रसिद्ध मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण कायमच चर्चेत असतो. कधी फिटनेससाठी तर कधी खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत येत असतो. नव्व्दच्या दशकात त्याने आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. आज ४ नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने आज त्याला अनेकजण शुभेच्छा देत आहेत. दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी आपल्या पोस्टमधून मिलिंदला शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन कुंडलकर यांनी पोस्टमध्ये लिहलं आहे ‘हॅप्पी बर्थडे , सगळीकडे धावत जाणारा मुलगा! काही वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये हा फोटो दुपारी जेवताना काढला आहे. आम्ही ऑफिसमधून मेट्रोने कॅफे मध्ये पोचलो आणि हा तीन किलोमीटर सहज धावत आला! अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सचिन कुंडलकर यांच्या ‘गंध’ चित्रपटात मिलिंद सोमणने काम केले होते.

book review my journey in lyrics and music memoir of syed aslam noor
 ‘पॉपी’ पर्वाचे पुराण…
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
career journey of actor james earl jones
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स
Thane Suicide youth, highly educated youth thane,
ठाणे : उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
R Ashwin roasted Pakistan cricket fan for trolling Nitish Reddy
R Ashwin : नितीश कुमार रेड्डीची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला अश्विनने शिकवला चांगलाच धडा, मीम्स व्हायरल
bombay hc refuses to direct cbfc to release certification copy to kangana ranaut emergency
Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
case registered against 42 rane and thackeray supporters over clashes on malvan rajkot fort
मालवण राजकोट किल्ल्यावरील राडा प्रकरणी राणे आणि ठाकरे समर्थकांवर गुन्हा दाखल

सबा आझादच्या ‘त्या’ पोस्टवर हृतिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने केली कमेंट; म्हणाली…

अमृत महोत्सवाचे औचित्य साधत मिलिंद सोमणने झाशी ते लाल किल्ला धावून यूनिटी रन मॅरेथॉन करण्याचे ठरवले होते. त्याने १५ ऑगस्ट रोजी झाशी येथून धावायला सुरूवात केली. तेथून थेट दिल्लीपर्यंत धावत त्याचा यूनिटी रनचा प्रवास २२ ऑगस्टला समाप्त झाला. दिल्लीच्या लाल किल्ल्याबाहेर तिरंगा फडकवत मिलिंदने घेतलेला प्रवास पूर्ण केला होता. पंतप्रधान ,मोदींचीदेखील त्याने भेट घेतली होती.

मिलिंद सोमण सध्या सोशल मीडियावर चर्चेत असतो. मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार आपल्या सोशल मीडिया अकाऊंटनवरून फोटो शेअर करत असतात. मिलिंद लवकरच कंगनाची ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. मिलिंद या चित्रपटात सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.