काँग्रेस नेते राहुल गांधींनी केब्रिंज विद्यापिठात केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे. या भाषणात त्यांनी चीनचं कौतुक करत भारतातील लोकशीही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा एक विचार संपूर्ण देशावर थोपवू पाहात आहेत असंही राहुल गांधींनी म्हणाले आहेत. राहुल गांधींच्या या भाषणावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता मराठी अभिनेत्यानेही राहुल गांधींच्या भाषणाबद्दल ट्वीट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भारतात लोकशाही संकटात आहे. पेगासस प्रकरणात माझाही फोन रडारवर होता. मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की फोनवर बोलत असताना सावधगिरी बाळगा कारण तुमचा फोन टॅप होतो आहे. भारतात एक प्रकारे दबावाचं वातावरण आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केसेस टाकल्या जात आहे. माझ्या विरोधातही काही केसेस आहेत. आम्ही आमचा बचाव करत आहोत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. भारताचे विद्यमान पंतप्रधान हे भारताचे मूळ विचार नष्ट करत आहेत. आपला एकच विचार ते भारतावर थोपवू पाहात आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेता आरोह वेलणकरने संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा>> एमसी स्टॅनचं नशीब उजळलं! शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा

आरोहने राहुल गांधींच्या भाषणासंदर्भातील एएनआयचं ट्वीट त्याच्या अकाऊंटवरुन रिट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी राहुल गांधींचा खोटारडा माणूस म्हणून उल्लेख केला आहे. “खोटारडा आणि निर्बुद्ध माणूस” असं म्हणत आरोहने रागाचे इमोजी पोस्ट केले आहेत. राहुल गांधींबाबत आरोहने केलेलं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. आरोह सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर तो परखडपणे मत व्यक्त करताना दिसतो.

हेही वाचा>> सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच अभिनेत्रीची वहिनी चिंतेत, म्हणाली, “दीदी तुम्ही…”

हेही वाचा>> “सुशांतमध्ये काय कमी होतं?” हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “नवऱ्याच्या पैशावर…”

राहुल गांधी केंब्रिजमधील भाषणात नेमकं काय म्हणाले?

केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी यांनी चीनचं कौतुक केलं आहे. चीन हा देश शांततेचा पुरस्कर्ता आहे, असं ते म्हणाले. चीनची रणनिती काय आहे यावर त्यांनी भाष्य केलं. तसंच त्याद्वारे चीनने कसा विकास केला हेदेखील आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.चीनमध्ये आपल्याला ज्या प्रकारच्या पायाभूत सोयी आणि सुविधा दिसतात त्या उत्तम आहेत. रेल्वे, एअरपोर्ट हे सगळं चीनने निसर्गाशी जोडलं आहे. चीन निसर्गासह उत्तम प्रकारे जोडला गेला आहे. अमेरिकेबाबत विचार केला तर अमेरिकेला वाटतं की आपण निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहोत. चीनचं सरकार उत्तम प्रकारे काम करतं आहे. एखाद्या कॉरपोरेशनप्रमाणे ते सरकार त्यांची कामं पूर्ण करतं. त्यामुळेच प्रत्येक माहितीवर सरकारची पूर्ण पकड असते. चीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतही खूप पुढे गेला आहे असंही राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठातल्या भाषणात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi on indian democracy marathi actor aroh welankar angry reaction kak
Show comments