मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत प्रथमेश-मुग्धा, स्वानंदी-आशिष, गौतमी-स्वानंद असे बहुतांश मराठी कलाकार लग्नबंधनात अडकले. आता नुकतीच ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता ऋषी मनोहर नुकताच पुण्यात विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीणी तन्मई पेंडसेशी लग्न केलं. यापूर्वी तन्मई व ऋषीचा साखरपुडा मे २०२३ मध्ये थाटामाटात पार पडला होता. त्यानंतर जवळपास ७ महिन्यांनी ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. तन्मई ही प्रसिद्ध डेंटिस्ट आहे.
हेही वाचा : “…अन् मी मांसाहार सोडला”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा खुलासा; म्हणाली, “साडेपाच महिने…”
ऋषी-तन्मईच्या लग्नसोहळ्यातील बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री ऋता दुर्गुळेने त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो शेअर करत या जोडप्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ऋषीबद्दल सांगायचं झालं, तर तो मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पौर्णिमा गानू मनोहर यांचा लेक आहे. ‘राजवाडे अँड सन्स’, ‘सुराज्य’, ‘तुझं माझं जमेना’, ‘पेट पुराण’, ‘वाडा चिरेबंदी’ अशा अनेक मालिकांमध्ये त्याच्या आईने काम केलं आहे. ऋषीच्या हळद, मेहंदी आणि ग्रहमख सोहळ्यातील देखील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.