‘दे धमाल’ या मालिकेत अनेक बालकलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. याद्वारे अभिनेता अनुराग वरळीकरने बालकलाकार म्हणून कलाविश्वात पाऊल ठेवलं. सध्या मराठी मनोरंजन विश्वात लगीनघाईला सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसाद-अमृताने थाटामाटात लग्न केलं. आता ‘दे धमाल’ आणि ‘पोरबाजार’ फेम अनुराग वरळीकरने त्याची खास मैत्रीण पायल साळवीबरोबर साखरपुडा करत एका नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे.

अनुरागने इन्स्टाग्रामवर अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्याच्या साखरपुड्यातील सुंदर क्षण त्याने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. सध्या मराठी कलाविश्वातून या अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत त्याला भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले आहेत.

Harshvardhan Rane
“एक मुलगी अचानक माझ्या कारमध्ये आली अन्…”; ‘सनम तेरी कसम’फेम हर्षवर्धन राणेने सांगितला किस्सा, म्हणाला…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
anil kapoor
अभिनेत्रीचा ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्याबरोबरच्या किसिंग सीनबाबत खुलासा; म्हणाली, “मला रडावे…”
Anusha Dandekar at Priyanka Chopra brother Siddharth sangeet watch video
Video: प्रियांका चोप्राच्या भावाच्या संगीत सोहळ्याला मराठी अभिनेत्रीची हजेरी, ग्लॅमरस लूकची होतेय चर्चा
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…

हेही वाचा : “त्याला आपली भाषा…”, ‘झिम्मा २’मध्ये दिसतेय ‘या’ परदेशी अभिनेत्याची झलक! कोण आहे तो?

सगळ्या कलाकारांमध्ये स्पृहा जोशीच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री म्हणते, “सुराला कच्चा आहे.. पण मुलगा चांगला आहे!! खूप खूप अभिनंदन अनुराग!” स्पृहा जोशीची ही कमेंट पाहून नेटकऱ्यांना तिच्या आणि अनुरागच्या २०१९ मध्ये एकत्र केलेल्या एका जाहिरातीची आठवण झाली आहे. दोघांनी एका नामांकित विवाहसंस्थेच्या जाहिरातीत काम केलं होतं. यामध्ये “सुराला कच्चा आहे.. पण मुलगा चांगला आहे!” असा डायलॉग होता. याशिवाय अनुरागप्रमाणे स्पृहा देखील ‘दे धमाल’ चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती.

हेही वाचा : “बाबा गेल्यावर तिला जोडीदार…”, आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सिद्धार्थ चांदेकरने मांडलं मत; म्हणाला, “तो अनुभव…”

दरम्यान, अनुराग वरळीकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तो केवळ अभिनेता नसून उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहे. ‘दे धमाल’ या मालिकेशिवाय त्याने ‘पोरबाजार’, ‘देवकी’, ‘बारायण’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Story img Loader