8
‘नाळ’, ‘नाळ २’, ‘पंचक’, ‘घर बंदूक बिर्याणी’ अशा चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे दीप्ती देवी(Deepti Devi) होय. याशिवाय दीप्ती देवी टीव्ही मालिकांमधूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळते. आता मात्र अभिनेत्री तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिने एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. दीप्तीने तिच्या खासगी आयुष्याबाबत केलेले विधान सध्या चर्चेत असलेले पाहायला मिळत आहे.
दीप्ती देवीने नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, मी तुझी एकदा पोस्ट वाचली होती, त्यामध्ये व. पु. काळे यांचा संदर्भ दिला होता. पिता आणि पती यामध्ये एका वेलांटीचा फरक आहे, अशा आशयाची ती पोस्ट होती; तर तुला असं का लिहावंस वाटलं होतं. त्यावेळी काय विचार होता? यावर बोलताना दीप्तीने म्हटले, “अनेक वर्षांपासून नात्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने टॅगलाइन्स आले आहेत. मला असं वाटतं की, या सगळ्या पलीकडे भावना खूप महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, जर मी समोरच्याच्या जागेवर असेन आणि मला असं काही झालं तर मला काय वाटलं असेल या बेसिक लाइनवर आपण जगलो तरी सगळी नाती चांगली राहतील.”
तुझं रिलेशन कसं होतं? कारण लग्न झाल्यानंतर आज तू सिंगल आहेस. हा विचार मांडताना तू सहजपणे मांडू शकतेस, कदाचित त्यावेळी तू मांडू शकत नसशील. यावर बोलताना दीप्तीने म्हटले, “मी कधीच माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले नाही, कारण मी त्यांच्यावर खूप प्रेम करते.”
“त्यांच्याबाबतीत कोणीही बाहेर चुकीचं बोललेलं मला चालणार नाही”
अरेंज मॅरेज होतं का? या प्रश्नाचे उत्तर देताना दीप्तीने म्हटले, “हो, अरेंज मॅरेज होतं, मी अजूनही त्यांच्यावर प्रेम करते; त्यामुळे त्यांच्याबाबतीत कोणीही बाहेर चुकीचं बोललेलं मला चालणार नाही. जर मी त्यांचे संरक्षण केले नाही तर कोणीही त्यांचे संरक्षण करणार नाही. मी सेलेब्रिटी असल्याने माझ्याकडे खूप पॉवर आहे. मी सांगण्याने खूप काही होऊ शकेल किंवा एकच बाजू मांडली जाईल, पण कशाला? मला आवडतं संरक्षण करणं. मला माझा संसार बघायला आवडलं असतं, पण ते नाही झालं.”
कोणत्या गोष्टींमुळे हे लग्न टिकलं नाही, असं तुला वाटतं? यावर दीप्तीने म्हटले, “मला माहीत नाही. कदाचित आम्ही एकमेकांना समजून घ्यायला किंवा स्वीकारण्यास पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. जसं मी खूप लहानपणी कामासाठी बाहेर पडले, त्यामुळे खूप लोकांबरोबर मला राहण्याची सवय आहे. मी सतत काम करत होते. काम करणं ही माझी आवड होती. मी कुठून आली आहे, हे त्याला कुटुंबाला कळणं किंवा सेलेब्रिटी म्हणून वेगळी आहे आणि एक मुलगी म्हणून वेगळी आहे. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्या जर एकत्र झाल्या तर त्याला सामोरं जाणं असू शकतं. आम्ही तीन वर्षे एकत्र होतो, त्यानंतर आपोआप जे झालं ते झालं. मी वेगळी होईन असा कोणीही विचार केला नव्हता. पण, तुमच्याकडे इलाजच नसेल तर तुम्ही काय करणार? मला जितकं शक्य होईल तितकं मी समजून घेण्याचा प्रयत्न केला की, काय चाललं आहे; काय करणं आवश्यक आहे. पण, मलाही कळायला माझा माझा वेगळा वेळ लागतो ना. माझ्या घरच्यांचं मत असं होतं की, तुम्ही दोघांनी बसून बोला. त्यांचं असं कधीच म्हणणं नव्हतं की तुझं सगळं बरोबर आहे आणि त्यांचं चुकलं आहे. सगळ्या पालकांना वाटतं त्याच्या मुलांनी खूश राहावं.”
हेही वाचा: …तर ऋषी कपूर यांनी आत्महत्या केली असती, नीतू कपूर यांनी लेक रिद्धिमाबद्दल बोलताना केलेलं वक्तव्य
परत रिलेशनशिप विचार केला नाहीस का?
आता तू आयुष्यात खूप पुढे आली आहेस, परत रिलेशनशिप विचार केला नाहीस का? यावर दीप्तीने म्हटले, “या सगळ्यात मी खूप थकले होते. एकतर माझा स्वभाव असा आहे की माझ्या मनात कोणासाठी घर व्हायला खूप वेळ लागतो. आता पुन्हा त्या रिलेशनशिपमधून बाहेर येण्याची एक वेगळी प्रोसेस असते, हे कोणी समजू शकत नाही. लोक म्हणतात की खूप जणांचे घटस्फोट होतात, पण आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनलेले आहोत. माझ्या मनात कोणाला जागा द्यायला इतका वेळ लागत असेल तर काढायलादेखील तितकाच वेळ जाईल. ही प्रोसेस वेळ घेते. तुम्हाला मानसिक, शारीरिक थकवा येतो आणि मग वाटतं की मी एकटीच खूश आहे. मला इतर कोणाला दुखवायचं नाहीये, मला पुन्हा स्वत:ला दुखवायचं नाही,” असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे