२०२५ वर्ष सुरू झाल्यापासून अनेक नव्या मराठी सिनेमांची घोषणा झाली आहे. तर काही सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यात दिवसागणिक वाढ होत असून आता ‘देवमाणूस’ या नव्या मराठी सिनेमाची घोषणा झाली आहे. हा मल्टीस्टारर सिनेमा असून यात महेश मांजरेकर, सुबोध भावे, रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार झळकणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आज (१५ जानेवारी २०२५) ‘देवमाणूस’ सिनेमाची घोषणा झाली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देवस्कर यांनी केले आहे. ‘देवमाणूस’ या चित्रपटाच्या स्टारकास्टमुळे हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक लव रंजन यांच्या निर्मितीसंस्थेने केली आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची लव फिल्म्स कंपनी अनेक लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांसाठी ओळखली जाते, त्यांनी ‘तू झूठी मैं मक्कार’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘दे दे प्यार दे’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता ही कंपनी मराठी सिनेमात प्रवेश करत आहे. ‘देवमाणूस’ हा त्यांच्या निर्मिती पहिला मराठी सिनेमा असून, तो २५ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाबाबत दिग्दर्शक तेजस देवस्कर यांनी सांगितले की, ‘देवमाणूस’ प्रेक्षकांना भावनिक प्रवास घडवून आणेल. त्याने आपल्या कलाकारांची स्तुती करत सांगितले की, “प्रेक्षकांनी हा चित्रपट अनुभवावा, यासाठी मी खूप उत्सुक आहे.” निर्माते लव रंजन यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले, “महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, कला, संगीत आणि कथाकथनाचा वारसा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आला आहे. मराठी सिनेमाच्या समृद्ध आणि रंगीबेरंगी दुनियेत प्रवेश करताना आम्हाला अभिमान वाटतो.
हेही वाचा…ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
निर्माते अंकुर गर्ग यांनी सांगितले की, मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना त्यांना अभिमान वाटत आहे. “महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला सामावून घेताना, तसेच या प्रतिभावान कलाकार आणि दिग्दर्शकांबरोबर काम करताना आम्ही आनंदित आहोत,” असे ते म्हणाले. गर्ग यांनी सांगितले की, “आम्ही प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत .”
लव रंजन हे बॉलीवूडचे दिग्दर्शक असून त्यांची निर्मिती संस्था पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. असे असले तरी बॉलीवूडमधील अनेक निमिर्ती संस्था आणि सेलिब्रिटींनी याआधीही मराठी सिनेमांची निर्मिती केली, यात अक्षय कुमारने ‘७२ मैल एक प्रवास’, प्रियांका चोप्राच्या निर्मिती संस्थेने ‘व्हेंटिलेटर’, ‘पाणी’, तर रोहित शेट्टीच्या निर्मिती संस्थेने ‘स्कुल कॉलेज लाइफ’ या मराठी सिनेमांची निर्मिती केली आहे.