‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय ठरला. कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवे विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून धरलं. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही घोषणा करण्यात आली. आता प्रसाद ओकने ‘धर्मवीर’ला एक वर्ष पूर्ण झाल्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’मध्ये प्रसादने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचंही दाखविण्यात आलं होतं. त्यामुळे आता या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवले जाणार आहे, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
आणखी वाचा – “तर मी माझ्या मुलीसाठी देशही सोडणार आणि…” लेक मालतीबाबत बोलताना प्रियांका चोप्राने केलेलं वक्तव्य चर्चेत
प्रसादही या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी उत्सुक आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या तयारीदरम्यानचा मेकिंग व्हिडीओ प्रसादने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने म्हटलं की, “‘धर्मवीर’ माझ्या आयुष्यातल्या या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या भूमिकेनी, या चित्रपटानी मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे”.
काय आहे प्रसाद ओकची पोस्ट?
आणखी वाचा – राणादाने पाठकबाईंना किस करतानाचा फोटो शेअर केला अन्…; मराठमोळ्या जोडप्याच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा
“पुन्हा एकदा प्रविण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, मा. खा. श्रीकांतजी शिंदे आणि मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि धर्मवीरच्या संपूर्ण टीमचे अत्यंत मनःपूर्वक आभार. रसिक प्रेक्षकांचेसुद्धा शतशः आभार. ‘धर्मवीर २’लाही आपले आशीर्वाद आणि प्रेम भरभरून मिळेल अशी आशा करतो. दिघे साहेब असेच कायम पाठीशी राहा”. प्रसादच्या या पोस्टनंतर ‘धर्मवीर २’ची आम्ही वाट पाहत आहोत असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.