शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ २०२२ मध्ये दिग्दर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट चांगलाच गाजला होता. प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक यांनी निभावली आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

‘सनातन हिंदू संस्थेचा मान आहे हा भगवा रंग, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशीतरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग’, अशा संवादासह धर्मवीर २चा ट्रेलर सादर करण्यात आला. चित्रपटाच्या माध्यमातून सद्य राजकीय स्थितीवर भाष्य केलेलं पाहायला मिळाले. शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलच्या ट्रेलरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

amitabh bachchan reacting on re releasing movies
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”
5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
Kangana Ranaut
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह; सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी म्हणाले, “सर्व समुदायांच्या भावना…”
old movies, mumbai, movies re-released,
जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित
old bollywood gang of vasepur and marathi tumbad movie rerealse in theatre
‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटासह गाजलेले हिंदी सिनेमे पुन्हा थिएटर्समध्ये होणार प्रदर्शित, वाचा यादी
rehnaa hai terre dil mein releases again in the theatres
पहिल्या नजरेत प्रेम, हिरोने लपवली ओळख अन्…; २३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ रोमँटिक चित्रपट! आजही प्रत्येक गाणं आहे सुपरहिट
Amruta Khanwilkars marathi upcoming film like and Subscribe is coming to the theatre soon
मुहूर्त ठरला! अमृता खानविलकरचा नवीन चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार, “आपल्या संघटनेचा माज आहे, हा भगवा रंग, सनातन हिंदू संस्थेचा मान आहे हा भगवा रंग, छत्रपती शिवरायांचा स्वप्न होता, हा भगवा रंग आणि कोणाशीतरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग” या डायलॉगने ट्रेलरची सुरूवात झाली आहे. याबरोबरच, आपणच आपल्या धर्माची लाज नाही राखली तर दुसरे कोणीतरी येऊन ती उतरवतील, असे संवाद या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आयुष्यावर आधारित भूमिकादेखील पाहायला मिळाली आहे. आता हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देणार हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे २’ ट्रेलर लॉन्च सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिग्गज अभिनेते अशोक सराफ, गोविंदा, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर या ट्रेलर लॉन्चवेळी उपस्थित होते. मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ९ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: निक जोनासने सहा वर्षांपूर्वी प्रियांकाला घातली होती लग्नाची मागणी; पोस्ट शेअर करत म्हणाला…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. “ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की…” असं सांगत ते संबंधित महिलेला मारहाण करणाऱ्याला चांगलाच धडा शिकवल्याचे टिझरमध्ये पाहायला मिळाले होते. ‘धर्मवीर २’बद्दल सांगायचं झालं, तर या सिनेमाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची, तर क्षितीश दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.