मराठीतील बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपट म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा २’. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून मराठी रसिक प्रेक्षकांना कधी एकदा चित्रपट प्रदर्शित होतोय, असं झालं आहे. सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटात झळकणारी अभिनेत्री हेमल इंगळेनं डबिंगचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या होत्या.

“चित्रपट कधी प्रदर्शित होणार?”, “आम्ही चित्रपटाची वाट बघतोय”, “लवकर चित्रपट प्रदर्शित करा”, “अटक मटक चवळी चटक एकदाची ही मूव्ही थिएटरला आणून पटक”, “जल्ला तुझा म्होरा लय आतुरतेने वाट बघताव आम्ही या पिक्चरची”, “ये दिकरा ते पिच्चर रिलीज झाल्या वरती. मला उठवशील काय”, अशा मजेशीर प्रतिक्रिया हेमलच्या व्हिडीओवर उमटल्या होत्या. अशातच ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटासंबंधिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून चित्रपटातील एक चूक, जी आजपर्यंत कुठल्याही प्रेक्षकाच्या नजरेस पडली नसेल ती पाहायला मिळत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो

२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. अजूनही हा चित्रपट तितक्याच आवडीनं पाहिला जातो. चित्रपटातील गाणी असो, डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यावर मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या चित्रपटाला १९ वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील एक अशी चूक जी आजवर कोणाच्या लक्षातही आली नसेल ती एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे.

हेही वाचा – ‘महाराज’ चित्रपटासाठी ४४ वर्षीय अभिनेत्याने घटवलं तब्बल २६ किलो वजन, Fat to Fit फोटो पाहून चाहते झाले चकित

‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ती चूक दाखवणारा व्हिडीओ श्रीधर सावंत नावाच्या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला आहे. त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘चला ना गडे’ गाणं सुरू होण्यापूर्वीचा सीन पाहायला मिळत आहे. भक्ती वक्रतुंडला गणपती पुळ्याला निवस्त्र येण्यासाठी मनवते आहे. भक्ती व वक्रतुंडच्या या सीनमध्ये मागून एक व्यक्ती डोकावताना दिसत आहे. त्या व्यक्तीचा या सीनशी काहीही संबंध नाहीये. ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ही चूक असल्याचं सांगून श्रीधरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: राहाला कडेवर घेऊन नव्या घराच्या पाहणीसाठी पोहोचली आलिया भट्ट; रणबीर व नीतू कपूरही होत्या सोबतीला, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “गेल्या कित्येक वर्षात २८० वेळा चित्रपट बघितला. पण कधीसुद्धा असलं काही दिसलं नाही राव…”, “भाऊ तुझी सेन्सॉर बोर्डवर नियुक्ती फिक्स”, “माणसांकडून होतात चुका”, “तो लाइटमॅन आहे, लाइट स्टँडच्या बाजूला, कटर (लाइट कटिंग ब्लॅक फ्रेम) घेऊन उभा आहे…एडिटरची चूक आहे, ते क्रॉप करायला विसरला”, अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Story img Loader