लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आतापर्यंत शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सरदारांचं शौर्य दाखवणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. तर आता आज दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सरदारांचा इतिहास चित्रपटांमधून सर्वांसमोर मांडणारे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता आणखी एका थोर व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचं नाव आहे ‘मुक्ताई.’ या चित्रपटामधून दिग्पाल लांजेकर संत ज्ञानेश्वर यांची धाकटी बहीण मुक्ताई यांच्या नजरेतून ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची गाथा सर्वांसमोर आणणार आहेत.

आणखी वाचा : “‘सुभेदार’ जूनमध्ये येणार होता ना?” नेटकऱ्याच्या प्रश्नाला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाले…

या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर शेअर करत दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलं, “नवे क्षितीज …नवे सीमोल्लंघन…कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने …संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची चिमुकली पण आभाळ व्यापून उरणारी बहीण मुक्ताई … तिच्या दिव्यदृष्टीने पाहिलेली ज्ञानेश्वरांच्या दैवी कुटुंबाची कथा !”

हेही वाचा : “जवळजवळ वीस वर्ष…”, विराजस कुलकर्णीने सांगितला दिग्पाल लांजेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव

हा त्यांचा आगामी चित्रपट २०१४ च्या जून महिन्यात प्रदर्शित होईल. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत आता त्यांचे चाहते आणि सिनेसृष्टीतील त्यांचे मित्र मंडळी या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत आणि याबरोबरच या चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटामध्ये कोणटे कलाकार कोणत्या भूमिकेत दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader