Subhedar Movie Review in Marathi : सध्या ऐतिहासिक चित्रपट म्हंटलं की आपल्या प्रेक्षकांच्या कपाळावर आठ्या पाहायला मिळतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’मुळे तर लोकांनी ऐतिहासिक चित्रपटांची चांगलीच धास्ती घेतली आहे. या अशाच वातावरणात आपल्या शिवराज अष्टकाच्या पाचव्या पुष्पाच्या म्हणजेच ‘सुभेदार’च्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर यांनी ऐतिहासिक चित्रपटांचं सादरीकरण कसं असावं उदाहरण आपल्यासमोर सादर केलं आहे. हा चित्रपट काही ऐतिहासिक चित्रपटांमधील माईलस्टोन नव्हे, यातही बारीक सारिक चुका आढळणारच शेवटी ती एक कलाकृतीच आहे. परंतु इतिहासाची मोडतोड न करता, पुरेसं कलात्मक स्वातंत्र्य घेऊन व्यावसायिक गणिताच्या बाबतीत निर्मात्यांना तसेच वितरकांना निराश न करता अन् प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच आणखी काहीतरी वेगळा अनुभव देणारा हा ‘सुभेदार’ प्रत्येकाने एकदा पाहायलाच हवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील हा पाचवा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा आपल्यापुढे मांडतो. अर्थात तानाजी मालुसरे यांचा पराक्रम सर्वश्रुत आहेच, शिवाय बॉलिवूडमध्येसुद्धा अजय देवगणने यावर एक तद्दन व्यावसायिक गल्लाभरू चित्रपट काढला जो तुफान गाजला. मग लांजेकर यांचा ‘सुभेदार’ का बघावा असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येऊ शकतो. याचं उत्तर अगदी सोप्पं आहे. ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रत्येक कलाकाराच्या सचोटीसाठी, दिग्पाल लांजेकर यांनी मांडलेल्या अत्यंत अभ्यासपूर्वक कथानक अन् त्याच्या मांडणीसाठी, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमासाठी अन् शेवटची ४० मिनिटं खिळवून ठेवणाऱ्या अन् भावूक करणाऱ्या क्लायमॅक्ससाठी प्रत्येकाने एकदातरी पाहायलाच हवा.
आणखी वाचा : Gadar 2 Review : जुन्या आठवणींना उजाळा देणारा बहुचर्चित ‘गदर २’ पाहायलाच हवा का? एकदा वाचा
कथा, सादरीकरण, ऐतिहासिक संदर्भ, त्याकाळातील भाषा, शस्त्रास्त्रे, वेशभुषेपासून अगदी अभिनयापर्यंत ‘सुभेदार’ हा अजय देवगणच्या ‘तान्हाजी’पेक्षा वरचढच आहे. काही अनावश्यक सीन्स आणि मावळ प्रांतातील भाषा यामुळे काही ठिकाणी पटकथा थोडी रेंगाळली आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करायला काहीच हरकत नाही. मध्यंतरापर्यंत चित्रपट हा तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मैत्रीवर प्रकाश टाकतो तर मध्यंतरानंतरचा भाग हा कोंढण्याच्या मोहिमेवर बेतलेला आहे. अशी सरळसोट जरी कथा असली तरी छोट्या छोट्या गोष्टींसाठी केलेला अभ्यास, गीत तसेच संगीत आणि नृत्य यासाठी घेतलेली मेहनत ही पडद्यावर दिसून येते. एखादं गाणं आणि काही छोटे मोठे सीन्स यांना कात्री लावली असती तर चित्रपटाने आणखी उत्तम पकड घेतली असती.
याबरोबरच दिग्पाल यांचा ‘सुभेदार’ पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ‘फर्जंद’ ‘फत्तेशिकस्त’पासून प्रत्येक चित्रपटात दिसणारी सुधारणा. कथा, दिग्दर्शन, स्पेशल इफेक्टपर्यंत सगळ्याच बाबतीत तुम्हाला प्रत्येक चित्रपटात उत्तम सुधारणा पाहायला मिळते आणि हे ऐतिहासिक चित्रपट करणाऱ्या फार कमी दिग्दर्शकांना जमतं. दिग्पाल यांचा ‘सुभेदार’मध्येही शेर शिवराजच्या तुलनेत बरेच बदल आणि सुधारणा पाहायला मिळते. ‘सुभेदार’ची आणखी एक खासियत म्हणजे तानाजी मालुसरे यांच्याबरोबरच इतर पात्रांना दिलेला योग्य न्याय, यामुळे चित्रपट तुम्हाला अधिक भिडतो. पटकथेत थोडा मार खाल्ला असला तरी त्याची कसर दिग्पाल यांनी संवादांमध्ये भरून काढली आहे. खासकरून मध्यंतरानंतरचे संवाद आणि शेवटाला तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यातील लढाईदरम्यानचे काही संवाद मनात घर करतात. चित्रपटाचं संगीतही उठावदार झालं आहे. ‘मावळ जागं झालं रं’ हे गाणं तर हमखास गुणगुणतच तुम्ही बाहेर पडाल.
सैफ अली खानने ‘तान्हाजी’मध्ये साकारलेला उदयभान आणि या चित्रपटात दिग्विजय रोहिदास यांनी साकारलेला उदयभान यात जमीन आस्मानाचा फरक आहे, अन् तो सर्वात जास्त अधोरेखित होतो मध्यंतरानंतर. उदयभान राठोड हा एक राजपुत सरदार होता हे आपल्या देहबोलीतून आणि संयत पण तितक्याच प्रभावशाली अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर ठसवण्यात दिग्विजय यशस्वी ठरले आहेत. ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू. बाकी छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर, जिजाऊ यांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, शेलार मामा यांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी, सूर्याजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचन्द्र, सावित्रीबाई मालुसरे साकारणारी स्मिता शेवाळे अन् तानाजी मालुसरे साकारणारे अजय पुरकर या सगळ्यांची कामं चोख झाली आहेत. बाकी अस्ताद काळे, ऋषि सक्सेना, मृण्मयी देशपांडे, अलका कुबल अन् बहिर्जी नाईक साकारणारे खुद्द दिग्पाल लांजेकर यांचीही कामं उत्तमच झाली आहेत.
आणखी वाचा : “मी मालुसरे, मी भोसले…”, ‘सुभेदार’मधील भूमिकांबद्दल मृणाल कुलकर्णींनी लेकासह सूनेला विचारला प्रश्न अन्…
सुरुवात थोडी खेचलेली वाटली तरी मध्यंतरानंतर चित्रपट चांगली पकड घेतो आणि शेवटची ४० मिनिटं अक्षरशः मंत्रमुग्ध करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्यातील मैत्रीचं नातं अन् केवळ आपल्या राजासाठी जिवावर उदार होऊन लढणाऱ्या त्या असंख्य शिलेदारांचं बलिदान पाहून आपण भावूक नक्कीच होतो. ‘सुभेदार’ हा परिपूर्ण ऐतिहासिक चित्रपट आहे असं मुळीच नाही, पण इतिहासाचा योग्य अभ्यास करून अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने मनोरंजक कथानक लोकांसमोर सादर करणारी ही एक उत्तम कलाकृती आहे जिचा आस्वाद प्रत्येक प्रेक्षकाने घ्यायलाच हवा. आज हिंदी चित्रपटांच्या गर्दीतही सकाळचे फार कमी शोज ‘सुभेदार’ला मिळालेले असतानाही या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी केलेली गर्दी पाहता मराठी चित्रपटसृष्टीत सकारात्मक बदल घडतोय असं म्हणायला हरकत नाही.