छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं. त्यानंतर आता ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे.

या पोस्टरवर घनदाट जंगल, डरकाळी फोडणार वाघ आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता दिसत आहे. यात तो पाठमोरा असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप त्याचा चेहरा समोर आलेला नाही. या पोस्टरला दिग्पाल लांजेकरांनी हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : स्मृती इराणींनी मासिक पाळीबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर ‘झिम्मा २’चे कलाकार म्हणाले, “महिलांना चार दिवस…”

“वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात… ‘शिवरायांचा छावा, १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!,” असे दिग्पाल लांजेकरांनी या पोस्टरला कॅप्शन दिले आहे.

‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर कोण साकारणार याची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे. यापूर्वी या चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

आणखी वाचा : “तो फक्त फरारी…”, दाऊद इब्राहिमच्या भेटीनंतर दिवंगत ऋषी कपूर यांनी केला होता महत्त्वाचा खुलासा

ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ येत्या १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत.

Story img Loader