प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ हे चार ऐतिहासिक चित्रपट प्रचंड गाजले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्लाही जमवला. त्यानंतर आता ‘श्री शिवराज अष्टका’तील पाचवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित असून त्यांचे पात्र कोण साकारणार, अशी चर्चा रंगली होती. अखेर त्या कलाकाराचं नाव समोर आलं आहे.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचव्या चित्रपटाची काही महिन्यांपूर्वीच घोषणा केली. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
आणखी वाचा : Video : “हाच दिवस, हीच वेळ…” प्रार्थना बेहेरेने पतीसह रोमँटिक व्हिडीओ केला शेअर, पहिल्या भेटीबद्दल केला खुलासा
त्यातच आता नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. याबरोबरच या चित्रपटात तानाजी मालुसरे यांचं पात्र कोण साकारणार याचाही उलगडा झाला आहे. “शिवाजी राजांचं अन् भगव्याचं रक्षन कराया आमी मराठे छातीचा कोट करून हुबं हाओत…हर हर महादेव !! अजय पुरकर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत…” असे कॅप्शन या पोस्टरला देण्यात आले आहे.
आणखी वाचा : “आपल्याला बायकांच्या…” ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर आदेश बांदेकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
त्यानुसार अभिनेते अजय पुरकर हे या चित्रपटात तानाजी मालुसरे हे पात्र साकारत आहेत, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.