सध्या सर्वत्र ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. तर आता या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. तर आज त्याची पत्नी दीपा चौधरीने त्याच्यासाठी लिहिलेली पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

दीपाने सोशल मीडियावर ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील अंकुश चौधरीचे काही फोटो पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करीत तिने लिहिले आहे, “आज १ मे, महाराष्ट्र दिन…. २८ एप्रिलला अंकुशचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. खरे तर मी तो एक दिवस आधीच पाहिला होता आणि तेव्हापासून मी पूर्णतः निःशब्द झाले आहे.”

prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Shocking video Husband took VRS due to wife's illness, wife died on the day of retirement
“नियतीचा खेळ” पत्नीच्या आजारपणामुळे लवकर रिटायरमेंट घेतली, पण निरोप समारंभातच तिने साथ सोडली; VIDEO पाहून धक्का बसेल
Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”

आणखी वाचा : Video: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गाणं सुरु होताच प्रेक्षकांनी केले असे काही की…; व्हिडीओ व्हायरल

पुढे तिने लिहिलं, “चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी मला माझ्या प्रतिक्रिया विचारल्या पण काय बोलू? काय सांगू? कळतच नव्हतं. फक्त अंकुशची बायको म्हणूनच नव्हे तर एक कलाकार म्हणून, एक सुजाण प्रेक्षक म्हणून ह्या कलाकृतीने मला खूप काही दिलं, शिकवलं, घडवलं आणि मुख्य म्हणजे माझ्याच माणसांची मला नव्याने ओळख करुन दिली. “

यानंतर तिने लिहिले, “बायको म्हणून मला अंकुशचा खूप खूप खूप अभिमान वाटतो. आज फक्त त्याची बायको म्हणून नाही तर त्याची फॅन म्हणून सुद्धा मी पुन्हा एकदा नव्याने त्याच्या प्रेमात पडले. ह्या चित्रपटासाठी एक अभिनेता म्हणून त्याने घेतलेल्या मेहनतीची मी स्वतः साक्षीदार आहे. ‘याची देही याची डोळा’ ज्यांना बघत, ज्यांच्या सहवासात त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली त्यांचीच भूमिका आज साकारायला मिळणं यासारखा दुग्धशर्करा योग नव्हे. आणि यासाठी त्याने घेतलेल्या मेहनतीचे बळ कदाचित बाबांकडून त्यांना मिळाले असावे.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ने IMDB साईटवर सलमान खानच्या चित्रपटाला टाकलं मागे, मिळवले ‘इतके’ रेटिंग्ज

शेवटी तिने लिहिलं, “चित्रपट बघताना काही क्षणानंतर अंकुश चौधरी दिसतच नाहीत आणि दिसतात ते पूर्णतः शाहीर साबळे, अभिनेता म्हणूनच नव्हे तर वास्तविक आयुष्यात क्षणिक का होई ना पण तुम्ही ही भूमिका आत्मसात करीत ती जगलात हेच एक अभिनेता म्हणून तुमचे यश आहे.” आता तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. यावर कमेंट करीत नेटकरी हा चित्रपट आणि अंकुशचे काम आवडल्याचे सांगत आहेत.

Story img Loader