सध्या ‘सर्किट’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. ऋता दुर्गुळे आणि वैभव तत्त्ववादी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून गेले अनेक दिवस या चित्रपटाची टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करीत होती. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ऋताने मनोरंजनसृष्टीत अनेकदा कलाकारांना गृहीत धरून त्यांच्याकडून काम करून घेतले जाते असे म्हटले होते. तर आता या चित्रपटाचे दिग्दर्शक आकाश पेंढारकर यांनीही चित्रपटसृष्टीतील त्यांना न पटणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गेले काही दिवस तेदेखील या चित्रपटाच्या कलाकारांबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. तर आता नुकतीच सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये ते सहभागी झाले. या वेळी “इंडस्ट्रीमधील कुठल्या गोष्टीचा तुला राग येतो,” असा प्रश्न त्यांना विचारला गेला. या प्रश्नाचे उत्तर देत त्यांनी इंडस्ट्रीमधील त्यांना खटकणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या.

आणखी वाचा : “१२ तास शिफ्ट करुनही…”, मराठी मालिकांमध्ये काम करण्यावरुन भडकली ऋता दुर्गुळे, म्हणाली, “मी सेटवरुनच निघून जायचे कारण…”

आकाश पेंढारकर म्हणाले, “इंडस्ट्रीत एकमेकांसाठी कुणीच खरे नाहीये. इंडस्ट्रीत मित्र बनवणे ही खूप अवघड गोष्ट आहे. या गोष्टीचा इतका राग येऊ शकतो की लोक आता तुमच्याबरोबर चांगले बोलतात आणि तुम्ही वळायच्या आत तुमच्याबद्दल वाईट बोलतात. हे इतके विरुद्ध आहे आणि ते इंडस्ट्रीत आहे. हे थांबत नाही, कारण आपण म्हणतो ना की एखाद्या इंडस्ट्रीला एखादा शाप लागलेला असतो…पण मी म्हटले तसे इथे लॉबिंगसुद्धा खूप जास्त आहे. सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये असते, हे मला माहीत आहे. इथे खूप लॉबिंग आहे. फक्त ते कुणी बोलत नाही.”

हेही वाचा : वैभव तत्त्ववादीने लग्न करण्याबद्दल केलं भाष्य; म्हणाला, “मला जे विचारतात…”

ते पुढे म्हणाले, “तुम्ही बघाल की एका कुठल्या तरी चित्रपटाच्या ग्रुपमध्ये तीच तीच लोक दिसतात. एकमेकांना इथे तिथे काम करू नको असेही सांगण्यात येते. ‘सर्किट’च्या बाबतीत हेच झालेय. काही लोकांना या चित्रपटात काम करू नको नाही तर हे होईल असं सांगण्यात आलंय. हे होतेच. म्हणून मी म्हणालो इथे खूप लॉबिंग आहे फक्त ते समोर दिसत नाही किंवा दिसू देत नाहीत. मला वाटते, कामाव्यतिरिक्त एकमेकांना भेटणे, एकत्र पार्टी करणे या गोष्टींपासून तुम्ही जितके लांब राहाल तितके तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित कराल तर तुम्ही यातून तरून जाल.” आता त्यांची ही मुलाखत खूप चर्चेत आली आहे.