सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतः उभ्या केलेल्या स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी नितीन देसाई यांनी आपले जीवन संपवले. त्यामुळे मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. नितीन यांच्या आत्महत्येबद्दल कलाकार मंडळी हळहळ व्यक्त करीत आहेत. प्रत्येकाला त्यांनी असं का केलं, असा प्रश्न पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन देसाई यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शनाचं काम केलं आहे. तसेच ऐतिहासिक मालिका व महानाट्यांसाठीही नितीन देसाई यांनी सेट उभारले होते. राष्ट्रीय पुरस्कारसह ‘फिल्मफेअर’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा या हरहुन्नरी कलाकाराने आत्महत्या केल्यामुळे प्रत्येकाला धक्का बसला आहे. दिग्दर्शक अक्षय इंडिकरने नितीन देसाई यांच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – नितीन देसाई यांनी लूक का बदलला होता? त्यांनीच सांगितलेलं दाढी वाढविण्यामागचं कारण

अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट करून नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तो म्हणाला, “साम्राज्य उभं केलं असं वाटणारी माणसं आतून किती अनामिक चिंतांनी ग्रासलेली असतात. असं काय असावं की, जगण्याचा खोटा सेट क्षणात उद्ध्वस्त करावा वाटला आजूबाजूचं जग नेपथ्य वाटून?आदरांजली नितीन चंद्रकांत देसाई.

हेही वाचा – Nitin Desai Suicide: “माझ्या पायाखालची जमीनच सरकली” नितीन देसाईंच्या आत्महत्येवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप जॉली माणूस…”

हेही वाचा – Nitin Desai Suicide: “नितीन दादाने असं का केलं…” कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येवर अभिजीत पानसेंची प्रतिक्रिया

अक्षयच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलेय, “कलेतला अकबर निद्रिस्त झाला.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, “वाईट आहे हे! भावपूर्ण श्रद्धांजली”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director akshay indikar reaction on nitin desai suicide pps
Show comments