मराठी कलाविश्वात सध्या ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘सुभेदार’ हा श्री शिवराज अष्टक मालिकेतील पाचवा चित्रपट आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता ‘सुभेदार’ चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांनी लढलेली कोंढाण्याची लढाई हा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या चित्रपटाला ‘सुभेदार’ नाव देण्यामागे एक खास कारण आहे याबद्दल दिग्पाल लांजेकर यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर पोहोचले हास्यजत्रेचे कलाकार! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”

‘सुभेदार’ चित्रपटाविषयी सांगताना दिग्पाल लांजेकर म्हणाले, “तानाजीराव मालुसरे हे विलक्षण योद्धा होते. शूर योद्धा असण्याबरोबरच तानाजीराव प्रशासकीय कामातही खूप हुशार होते. कोकणात जाणाऱ्या अनेक रस्त्यांचे काम त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकामात सुद्धा त्यांचा काही अंशी सहभाग होता. प्रशासक म्हणून ते महाराजांच्या आणि आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कसे तयार झाले, त्यांनी स्वराज्यासाठी कसे काम केले हे दाखवण्याचा प्रयत्न ‘सुभेदार’मधून करण्यात आला आहे.”

हेही वाचा : Video : “जय शिवराय!”, ‘सुभेदार’ चित्रपटातील कलाकारांसह मरीन ड्राईव्हवर थिरकली तरुणाई, व्हिडीओ व्हायरल

दिग्पाल लांजेकर पुढे म्हणाले, “‘सुभेदार’ असे चित्रपटाचे नाव ठेवण्यामागे खास कारण आहे ते म्हणजे, ‘सुभेदार’ म्हणून ‘प्रशासकीय’ आणि ‘सैन्य’ अशी दुहेरी जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी सांभाळली होती. अशा दोन्ही प्रकारचे किंवा विभागांचे ‘सुभेदार’ एकच व्यक्ती असणे हे इतिहासातील एकमेव उदाहरण आहे.”

हेही वाचा : “मुंबईच्या लोकल ट्रेनची भीती…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला अनुभव; म्हणाली, “बायका मला ढकलून…”

“तुम्ही नेहमी जसा बायोपिक पाहता तसा सुभेदार चित्रपट नसेल. यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे भावरुपात्मक टप्पे जसे की, सुभेदारांचे आणि आऊसाहेबांचे नाते, त्यांचे आणि शिवाजी महाराजांचे नाते कसे होते? या गोष्टी पाहायला मिळतील. तानाजी मालुसरे यांचे आऊसाहेब आणि शिवरायांशी घट्ट नाते असल्यामुळे त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान देताना मागेपुढे पाहिले नाही, ही शक्ती त्यांना कुठून मिळाली? हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे.”, असे दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director digpal lanjekar reveals historical story behind movie name subhedar sva 00
Show comments