‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या शिवराज अष्टकातील चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटांनंतर लवकरच मोठ्या पडद्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहायला मिळणार आहे. ‘शिवरायांचा छावा’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच एक इतिहास रचला आहे.

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची पहिली झलक समोर आली होती. यानंतर आता या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला आहे.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Marathi cinema Paithani web series Gajendra Ahire entertainment news
सकस चित्रपट कधीच काळाच्या पडद्याआड जात नाहीत…; दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचे मत
Loksatta lokrang Documentary Film Institute Director creation and thoughts that explain social consciousness
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  निर्मितीच्या तीन तऱ्हा

‘शिवरायांचा छावा’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहे. त्यामुळे हा चित्रपट टाइम्स स्क्वेअरवर मोशन पोस्टर प्रदर्शित करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे निर्माते मल्हार पिक्चर कंपनीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत ‘शिवरायांचा छावा’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित टाईम्स स्क्वेअरवर झळकताना दिसत आहे. “आमचा टीझर टाइम्स स्क्वेअरवर प्रदर्शित झाला” असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : ‘गडकरी’ चित्रपटात नितीन गडकरींची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता, पहिला लूक आला समोर

या चित्रपटाची निर्मिती वैभव भोर आणि किशोर पाटकर, सहयोगी निर्माता भावेश रजनीकांत पंचमतिया आणि कार्यकारी निर्माता प्रखर मोदी यांनी केली आहे. मल्हार पिक्चर कंपनीच्या प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader