दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची सातत्याने चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. आजोबांच्या म्हणजेच शाहीर साबळे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी निमित्त त्यांचा नातू केदार शिंदे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटात अंकुश चौधरीचा शाहीर साबळेंचे पात्र साकारण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

केदार शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकुश चौधरीचा या चित्रपटातील लूक कसा तयार झाला, त्यासाठी काय काय मेहनत घ्यावी लागली, याबद्दलचा पडद्यामागचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. यात अंकुश चौधरीचा शाहीर साबळे होण्यापर्यंत प्रवास दाखवण्यात आला आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात लतादीदी ते बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची नाव समोर, पाहा त्यांची झलक

Tragic Incident in Sangli, sangli, Young Man Swept Away by River Current, Young Man Swept Away in sangli, Young Man Swept Away by River Current While Taking Selfie, sangli news, marathi news, loksatta news
सांगली : सेल्फी घेताना नदीत पडून तरुण बेपत्ता
Conspiracy to kill young man from an affair The crime was solved after three years
प्रेमसंबंधातून तरूणाचा कट रचून खून; गुन्ह्याची तीन वर्षांनी उकल
Salman Khan Firing Case News
सलमान खानच्या हत्येसाठी २५ लाखांची सुपारी अन् पाकिस्तानातून शस्त्र मागवण्याचा होता कट, आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर
Vanchit Bahujan Aghadi office bearers were fired upon buldhana
बुलढाणा: वंचित आघाडी पदाधिकाऱ्यांच्या वाहनावर गोळीबार! काचा फोडण्याचा प्रयत्न
drunken man was pelting the young man with a stone video goes viral
वर्धा : दारूडा ‘त्याला’ दगडाने ठेचत होता; लोकांची मात्र बघ्याची भूमिका! काही जण व्हिडिओ काढण्यात व्यग्र…
Rohit Pawar on Ajit pawar
“भाजपाचा पराभव केवळ अजितदादांमुळे नाही, तर…”, रोहित पवारांच्या विधानाची चर्चा; म्हणाले, “तिसरा पर्याय…”
Solapur, Thieves, gold jewellery,
सोलापूर : बार्शीत चोरट्यांनी सराफाचे सोन्याचे दागिने लुटले
Mahalaxmi express
मुस्लीम महिलेच्या पोटी ‘महालक्ष्मीचा’ जन्म; एक्स्प्रेसमध्ये प्रसूती झाल्याने चिमुकलीच्या नावाची चर्चा!

या व्हिडीओची सुरुवात अंकुश चौधरीच्या चेहऱ्याचे माप घेण्यापासून होते. त्यानंतर अंकुशची दाढी केली जाते. यानंतर अंकुशचा चेहरा शाहीर साबळेंसारखा दिसावा यासाठी त्याला त्याप्रकारे मेकअप केला जातो. यानंतर त्यांचा रंग, पेहराव आणि त्यांची शैली यांसारख्या अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. यामागे प्रचंड मेहनतही पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये केदार शिंदे अंकुशला शाहीरांचे हावभाव कसे होते, हे देखील सांगताना दिसत आहे. केदार शिंदेंनी हा व्हिडीओ शेअर करताना त्याला हटके कॅप्शन दिले आहे. “असा घडला अंकुश चौधरीमध्ये बदल. महाराष्ट्र शाहीर होण्याचा अद्भुत प्रवास”, असे त्यांनी म्हटले आहे. अंकुश चौधरीचा हा लूक अनेकांना आवडला आहे. अनेक प्रेक्षक त्याचे भरभरुन कौतुक करताना दिसत आहे.

आणखी वाचा : “मला धाकधूक होती की अंकुश चौधरी…” राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.