प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘जत्रा’. २००६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. केदार शिंदे दिग्दर्शित आणि लिखित या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडेकर यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. साताऱ्यामधील एका गावामध्ये ‘जत्रा’चं चित्रीकरण करण्यात आलं. केदार यांनी आता एक व्हिडीओ शेअर करत ‘जत्रा’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आणखी वाचा – Video : “मी हिंदी भाषेमध्ये बोलू शकत नाही असं तुम्हाला वाटतं का?” पापाराझी छायाचित्रकारांना सनी लिओनीचा सवाल

youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
1.5-Year-Old's child Climb Up Tikona Fort!
Video : असे संस्कार प्रत्येक आईवडिलांनी करावे! दीड वर्षाच्या चिमुकल्याने सैर केला तिकोना किल्ला! व्हिडीओ एकदा पाहाच
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल
Jitendra Awhad, Filming by police , Jitendra Awhad house, police at Jitendra Awhad house, Jitendra Awhad latest news,
VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या घरात पोलिसांकडून चित्रीकरण, आव्हाडांनी विचारला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब

केदार शिंदे ‘महाराष्ट्र शाहीर’ या त्यांच्या आगामी चित्रपटासाठी सातारामध्ये गेले होते. यावेळी त्यांनी ‘जत्रा’ चित्रपटाचं चित्रीकरण ज्या गावामध्ये केलं त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या चित्रपटाला आता १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. या १७ वर्षामध्ये ‘जत्रा’चं ज्या गावामध्ये चित्रीकरण झालं त्या गावाचं रुपच बदलेलं आहे. केदार शिंदे यांनी यादरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे.

“२८ ऑक्टोबर २००५ साली ‘जत्रा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या २८ ला १७ वर्ष झाली त्या दिवसाला. एक तो दिवस आहे आणि एक आजचा. या वर्षांमध्ये ‘जत्रा’ने महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना अगणित वेळा हसवलं आहे. त्याच्या गाण्यांनी कैक कार्यक्रम आणि डी जे पार्टीज रंगवल्या आहेत. कित्येकांच्या आयुष्याचा भाग बनलेला ‘जत्रा’ आमच्याही आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.” असं केदार शिंदेंनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : …अन् मृणाल कुलकर्णी यांच्या लेकाने चक्क ताज हॉटेलमध्ये बायकोला दिलं वाढदिवसाचं सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

पुढे ते म्हणाले, “सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यात गेलेलो असताना पुन्हा एकदा त्याच ठिकाणांना भेट दिली जिथे ‘जत्रा’ शूट झाला होता. आणि कित्येक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आता सगळं बदललं आहे पण अजून आपली ‘जत्रा’ तशीच आहे.” या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

Story img Loader